पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई . सुगंधित तंबाखू व वाहनासह 27 लाख 36 हजार 247 रुपयाचा मुद्देमाल जप्त
पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई . सुगंधित तंबाखू व वाहनासह 27 लाख 36 हजार 247 रुपयाचा मुद्देमाल जप्त
गोंदिया- जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीत अवैधरीत्या चालणारे धंदे व बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे तसेच आगामी ग्रामपंचायत निवडणुकीचे अनुषंगाने, जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन व आळा घालण्याकरीता पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे यांनी विशेष पथकाची स्थापना करून सदर पथकास या बाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी श्री. संकेत देवळेकर यांचे नेतृत्वातील विशेष पथकाची अवैध धंद्याविरुद्ध विशेष धाड मोहीम सुरु आहे.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री.अशोक बनकर, यांचे आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी श्री. संकेत देवळेकर यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनाखालील विशेष पोलीस पथकाने मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 8/12/2022 रोजी पोलिस ठाणे गोरेगांव, हद्दीत छापा कारवाई केली असता-
1 )इसम चालक नामे राजेश बुधाराम राजगडे वय २६ वर्षे रा. सिव्हील लाईन, गोविंदपुर, गोंदिया व सोबती
2)मासुम चंदु आसवानी, वय २४ वर्षे, रा. सिंधी कॉलोनी, गोंदिया
यांचे ताब्यातील वाहनात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू अवैधरित्या वाहतूक करतांना एक अशोक लेलँड कंपंनीचे मालवाहक ट्रक क्रमांक *एम.एच. 35 ए.जे. 2077 मिळून आले. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू एकुण किंमती 9,58,600/- रूपये व एक अशोक लेलँड कंपनीचा क्रिम रंगाचा मालवाहक किमती 6,00,000/- अवैधरित्या मिळून आल्याने जप्त करण्यात आले. तसेच व गोंदिया शहर हद्दीतील नांगपुरा मुर्री येथील गोडावून मध्ये विनापरवाना साठवणूक करून ठेवलेल्या ठिकाणी पथकाने छापा मारला असता गोडवून मध्ये अवैधरित्या साठवणूक करुन ठेवलेला शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, व तंबाखू एकूण किंमती 11,77,647/-* रूपयाचा मुद्देमाल असा वाहनातील व गोडावून मधील मुद्देमाल *एकूण किमती 27,36,247/- रु. चा मिळून आल्याने जप्त करण्यात आले.
सदर प्रकरणी 1)इसम चालक नामे राजेश बुधाराम राजगडे वय २६ वर्षे रा. सिव्हील लाईन, गोविंदपुर, गोंदिया व सोबती
2)मासुम चंदु आसवानी, वय २४ वर्षे, रा. सिंधी कॉलोनी, गोंदिया
यांचे विरुद्ध पुढील योग्य कायदेशीर कारवाई करण्या करीता अन्न औषध प्रशासन विभागास पत्रव्यवहार करण्यात आले असुन मुद्देमाल त्यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कार्यवाही अन्न औषध प्रशासन विभाग करीत आहेत.
सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री. देवळेकर यांचे नेतृत्वात नेमलेले विशेष पोलीस पथकामधील पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखेडे, पोलीस अंमलदार पो. हवा. सुजित हलमारे, पो. हवा. महेश मेहर, पो.ना. शैलेषकुमार निनावे, पो. शि. सन्नी चौरसिया, दया घरत यांनी केली आहे.