Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

लोहीया विद्यालयात स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सोहळा संपन्न

सौंदड – लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा तसेच लोहिया कॉन्व्हेन्ट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल , सौंदड यांच्या संयुक्त स्नेहसंमेलनाचे उद्घाटन दि.२९ डिसेंबर २०२२ ला मा. स्वामी ज्ञानमूर्त्यानंद( संतोष महाराज) रामकृष्ण मठ, धंतोली नागपूर यांच्या शुभहस्ते , मा.सुभाष अग्रवाल, माजी अध्यक्ष, लो.शि.संस्था यांच्या अध्यक्षतेखाली, मा.डॉ.विक्रम आव्हाड, दिवाणी न्यायधीश क. स्तर व न्यायदंडधिकारी प्रथम श्रेणी,सडक अर्जुनी यांच्या प्रमुख आतिथ्याखाली व मा. सुरेशकुमार लोहिया, संचालक रामदेवबाबा स्मारक समिती, नागपूर, मा.जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष, लोहिया शिक्षण संस्था , सौंदड मा. प्रभूदयाल लोहिया,माजी जि. प. सदस्य, भंडारा मा. पंकज लोहिया, सदस्य लो. शि. संस्था , विद्यालयाचे प्राचार्य मा. मधुसूदन अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी भारत माता, सरस्वती माता ,भगवान गणेश तसेच स्व. रामेश्वरदासजी लोहिया व स्व.जमुनादेवी लोहिया यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. तसेच स्नेहसंमेलनाचे दीपप्रज्वलन मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडले.
यावेळी मा.आ.न.घाटबांधे, उपाध्यक्ष, लो. शि. संस्था, मा.रामभाऊ झोडे, संस्था सदस्य, मा.नरसिंगदास अग्रवाल, मा.रमेशचंद्र खंडेलवार,मा. चिंतामण थेर, मा.अनिल मेश्राम, मा. महादेव लाडे, मा. प्रल्हाद कोरे, मा. अनिल दीक्षित, मा. गुलाब शहारे, मा. पुरुषोत्तम लांजेवार, मा.नलिराम चांदेवार, मा. राजकुमार चांदेवार,मा. देवराम मासुरकर प्राचार्य गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे, प्राध्यापक आर.एन.अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.
स्नेह संमेलनाचे उद्घाटक, अध्यक्ष व प्रमुख अतिथी व प्रमुख उपस्थितींचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य मा. मधुसूदन अग्रवाल यांनी संक्षिप्त पण विद्यालयाविषयी सर्वव्यापी अहवाल प्रास्ताविकाद्वारे सादर केले.

मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे व देशभक्तीपर मनमोहक असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटक मा. स्वामी ज्ञानमूर्त्यानंद (संतोष महाराज )यांनी विद्यार्थ्यांना “महापुरुषांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेवून आदर्श नागरिक बनून भारतमातेची व मानवतेची सेवा करा” असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सुभाषचंद्र अग्रवाल,माजी अध्यक्ष लो. संस्था सौंदड तसेच प्रमुख अतिथी मा. डॉ. विक्रम आव्हाड, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी ,सडक अर्जुनी यांनी सुद्धा विद्यार्थांना सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमांमध्ये सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते मानव विकास योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक श्री.डी.ए.दरवडे तसेच स.शि. कु.यु.बी.डोये यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य गुलाबचंद चिखलोंडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम गीताने करण्यात आली.

error: Content is protected !!