Thursday, July 3, 2025
सड़क अर्जुनी

सडक अर्जुनी शहरात शासनाकडून प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजा जोरात विक्री,लहान मुले आणि नागरिकाचा होऊ शकतो मोठा अपघात

सोर्श गूगल फोटो - नायलॉन मांजा द्वारे जखमी झालेला ईसंम

सोर्श गूगल फोटो – नायलॉन मांजा द्वारे जखमी झालेला ईसंम

शासनाकडून प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजा सडक अर्जुनी मध्ये जोरात विक्री,लहान मुले आणि नागरिकाचा होऊ शकतो मोठा अपघात
सडक अर्जुनी -9/1/23- डॉ.सुशील लाडे – नुकताच नवीन वर्षाला सुर्वात झाली आहे.येत्या 15 जानेवारी ला मकरसंक्रांत सन येत आहे. मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची प्रथा आहे. शासनाकडून निर्देश आहेत की पतंग उडविण्याचा नादात नायलॉन मांजा चा वापर मोठ्या प्रमाणत केला जातो आहे त्या करीता शासना द्वारे पर्यापरण संरक्षण अधिनियम 1986 च्या विविध कलम द्वारे गुन्हा नोंद केला जाहील.

नायलॉन मांजा द्वारे जखमी झालेला पक्षी
नायलॉन मांजा द्वारे जखमी झालेला पक्षी

परंतु ह्या सर्व नियमांना डावलून सध्या सडक अर्जुनी शहरात मोठ्या प्रमाणत शासन द्वारे प्रतिबंधित आलेल्या नायलॉन मांजा ची विक्री जोमात सुरू आहे. जागो जागी लहान मुले नायलॉन मांजा पतंगाला लागून पतंग उडवित असतात मुले तर लहान असतात त्यांना त्याची समज नाही परंतु पालक वर्गाची जबाबदारी आहे की त्याचे दुष्परिणाम काय होतील याची समज पालक वर्ग आणि नायलॉन मांजा विक्री दुकानदाराने घ्यायला हवे.

कित्येक उदाहरण आहेत की ह्या नायलॉन मांजा ने लहान मुलांचे गळे, हात, बोटे कापले गेले आहेत. मोटासायकल प्रवासी सुद्धा ह्या मांजा मुळे जखमी झाले आहेत. नायलॉन मांजा कित्येक ठिकाणी अडकून असतो कधी कधी कुणाला दिसत नाही लहान मुले असो की प्रवाशी जात असताना त्यांचा चुकून लक्ष नसल्याने ह्या मांजा द्वारे शरिरावर जखमा झाल्या आहेत यात पशु पक्षी ह्यात अडकून मृत्यमुखी पडले आहेत.
गोंदिया शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 कलम 5,15, भादवी कलम 188 प्रमाणे गुन्हे नोंद केल्या गेले.
संबंधित विभागाने पोलीस खात्याने आता मोठ्या अपघातांची प्रतीक्षा न पाहता प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाही करावी अशी मागणी पर्यावरण मित्र आणि नागरिक करीत आहेत.

error: Content is protected !!