Friday, July 4, 2025
क्राइमगोंदिया

नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन व चोरी करणाऱ्या 21 आरोपींतांना अटक

गोंदिया दि.१३-पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई, महाल गाव घाट, वैनगंगा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन व चोरी करणाऱ्या 21 आरोपींतांना अटक व गुन्हा दाखल. 21 ट्रॅक्टर ट्रॉली सह 5 ब्रास वाळू असा किंमती 01 करोड 27 लाख 20,000/-हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे, यांनी विशेष पथकाची स्थापना करून गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील बेकायदेशीर व अवैध धंद्यांवर कारवाई करण्या बाबत निर्देश देवून विशेष पथकास धडक कारवाई करण्यास आदेशित केले होते.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक,  निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक,  अशोक बनकर यांचे निर्देशान्वये व मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी. संकेत देवळेकर यांचे विशेष पथकाची जिल्ह्यात अवैध धंदयांविरुध्द मोहिम राबवून धडक कारवाई सुरू आहे.
त्या अनुषगाने विशेष पथकाने दिनांक- 12/01/2023 रोजी दुपारी 3 वाजता सुमारास पोलीस ठाणे-दवनिवाडा हद्दीतील महालगांव घाट,वैनगंगा नदी च्या पात्रात काही लोक मोठ्या संख्येने अवैधरित्या रेतीचे उत्खनन व वाळू ची चोरी करून वाहतूक करीत असलेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे सापळा रचून वाळूचे उत्खनन व चोरी करणाऱ्या विरुद्ध महालगाँव घाट वैनगंगा नदीपात्र परिसरात छापा घालून धडक कारवाई केली असता-

महालगाँव घाट वैनगंगा नदीपात्र परिसरात मोठ्या संख्येने लोक अवैध रित्या गौण खनिज वाळूचे उत्खनन करून वाळूची चोरी व वाहतूक करतांना मिळून आल्याने *21 ट्रॅक्टर* ट्रॉली सह 5 ब्रास वाळू, किंमती 1 करोड 27, लाख 20, हजार/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

*सदर प्रकरणी आरोपी ट्रॅक्टर चालक नामे*–
1) प्रमोद कबीरलाल येरणे, वय 25 वर्ष रा. धापेवाडा
2) मुकेश सुरेश येरणे, वय 24 वर्ष रा. धापेवाडा
3) धर्मेंद्र सुरेश नैखाणे, वय 28 वर्ष रा. महालगाव
4) देवानंद अर्जुन आगाशे, वय 22 वर्ष रा. महालगाव 5) फिरोज अनंतराम मानकर, वय 40 वर्ष रा. शिवनी (दासगांव)
6) तिलक इंद्रपाल पालेवार, वय 27 वर्ष रा. निलज (दासगाव)
7) लक्ष्मीनारायण मुलचंद भोयर, वय 25 वर्ष रा. महालगाव
8) किशोर तेजराम आगाशे, वय 25 वर्ष रा. महालगाव 9) विशाल देवलाल भुरे, वय 21 वर्ष रा. पांढराबोडी 10) राहूल मानिकचंद ठकरेले, वय 23 वर्ष रा. धापेवाडा
11) आशिष भाऊलाल गायकवाड, वय 31 वर्ष रा. रतनारा
12) बलदेव अनंतराम मस्करे, वय 39 वर्ष रा. धापेवाडा
13) क्रिष्णा कुवरलाल मेश्राम, वय 27 वर्ष रा. लोधीटोला (धापेवाडा)
14) शुभंम लक्ष्मीप्रसाद लिल्हारे, वय 29 वर्ष रा. महालगाव
15) भुषण कपुरचंद नागपुरे, वय 51 वर्ष रा. महालगाव
16) सुरेंद्र पुरणलाल आगाशे, वय 21 वर्ष रा. महालगाव
17) नितेश नंदलाल भुरे, वय 24 वर्ष रा. महालगाव 18) अनिल बळीराम कवरे, वय 37 वर्ष रा. धापेवाडा 19) प्रविण चेतनदास नागपुरे, वय 22 वर्ष रा. महालगाव
20) रिंकू हरिशंकर गुडय्या, वय 25 वर्ष रा. मुरदाडा
21) गुलाब ग्यानीराम नागपुरे, 28 वर्ष रा. सावरी ता.जि. बालाघाट (म.प्र.),

यांचेविरुद्ध महालगाँव घाट, वैनगंगा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून स्वतः चे आर्थिक फायद्याकरीता शासनाचा महसूल बुडवून रेतीची चोरी प्रकरणी अरोपितां विरुद्ध पोलीस ठाणे दवनिवाडा येथे *कलम 379, 34 भारतिय दंड संहिता* अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीतांना अटक करण्यात आलेली असून दवनिवाडा पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास दवनिवाडा पोलीस करीत आहेत.

सदरची उत्कृष्ट कारवाई पोलीस अधीक्षक . निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, अशोक बनकर यांचे निर्देश, व आदेशान्वये व मार्गदर्शना खाली  संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांचे विशेष पथकातील पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेवून कामगीरी केलेली आहे. केलेल्या कामगिरीचे वरिष्ठांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!