सौंदड व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष पदी संदीप मोदी
सौंदड: सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय सौंदड येथे दिनांक 15 जानेवारी रोजी गावातील लहाण मोठे दुकानदार तसेच सर्व व्यापारी वर्गाची मीटिंग घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सौंदड येथील सरपंच हर्ष मोदी, उपसरपंच भावराव यावलकर व सर्व ग्रा.प. सदस्य यांच्या प्रमुख उपस्थित मीटिंग संपन्न झाली. यावेळी व्यापारांच्या वैयक्तिक समस्या जाणून घेतल्या, त्यातच व्यापारांची समिती गठीत करण्यात आली.
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पदी संदीप मोदी यांची नियुक्ती करण्यात आली तर कार्याध्यक्ष पदी नरेश चांदेवार आणि अन्य सदस्य असे सर्व व्यापारी वर्गातुन सर्वानुमते ठरविण्यात आले. संदीप मोदी गोंदिया जिल्हा भाजप पक्षाचे व्यापारी संघटनेचे ही उपाध्यक्ष आहेत. त्यातच ते सौंदड येथील उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. त्यांनी अनेक गरजु लोकांची देखील मदत केली आहे.