Wednesday, May 14, 2025
अर्जुनी मोरक्राइम

अवैध रित्या देशी दारु ची वाहतूक करणाऱ्यावर कारवाही

अर्जुनी मोर, दिनांक : 21 जानेवारी 2023 : विशेष पथकाला मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस ठाणे अर्जुनी- मोर परीसरात मोरगाव रोड चौकात सापळा रचून रात्री दरम्यान छापा कारवाई केली असता. एक मारुती रीट्झ गाडी क्र. MH -02 CV- 9661 चा चालक/मालक नामे – गणेश चंद्रमौली शिलेवार वय 27 वर्षे राहणार- बाराभाटी, ह.मु. बरडटोली तालुका- अर्जुनी मोर, जिल्हा- गोंदिया हा त्यांचे ताब्यातील चार चाकी मारुती कंपनी च्या रीटज गाडीमध्ये अवैध रित्या विनापास परवाना देशी दारु ची वाहतूक करतांना मिळून आल्याने आरोपी यांचें ताब्यातून एक चार चाकी मारुती कंपनीची रिटझ गाडी किंमत अंदाजे 2 लाख रुपये, देशी दारूचे 9 नग बॉक्स मध्ये 90 एम. एल. ने भरलेल्या 900 नग देशी दारू च्या बाटल्या असा एकूण किंमती 2 लाख 31 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल अवैधरित्या विना पास परवाना वाहतूक करतांनी मिळून आल्याने जप्त करण्यात आले आहे.

सदर प्रकरणी आरोपी १) गणेश चंद्रमौली शिलेवार वय 27 वर्षे राहणार- बाराभाटी, ह.मु. बरडटोली तालुका- अर्जुनी मोर, जिल्हा- गोंदिया, यांचे विरुद्ध पोलीस ठाणे अर्जुनी मोरगाव येथे कलम 65 (ई), 77 (अ), 80, महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन मुद्देमालासह आरोपी अर्जुनी/ मोरगाव पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही अर्जुनी मोरगाव पोलीस करीत आहेत.
सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी संकेत देवळेकर यांचे विशेष पोलीस पथकामधील पोलीस अंमलदार पो. हवा. सुजित हलमारे, पो. हवा. महेश मेहर, पो. ना. शैलेष कुमार निनावे, दया घरत, चा. पो. शि. हरिकृष्णा राव यांनी केलेली आहे.

error: Content is protected !!