सडक अर्जुनी शहरात धूम स्टाईल मुळे नागरिकांच्या जीवाला धोका!

mkm news 24- Dr. Sushil Lade
सडक अर्जुनी- हल्ली शहरात हव्याच्या वेगाने धूम स्टाईल ने बाईक चालवणे फॅशन झाले आहे. काही हवसी गवसी मुले ज्यांच्या कडे लायसन्स सुद्धा नाही तर काही नाबालिक मुले सिनेमा बघू बघू स्वतःला हिरो समजत जोरात वाहने चालवत असतात. सध्या हे बघायचे असल्यास शेंडा मार्ग ला आमंत्रित आहात. सडक अर्जुनी येथील दुर्गा चौक हे वर्दळी चे ठिकाण असल्या मुळे मोठ्या प्रमाणत नागरिकांचे आवागमन होत असते.
ह्या चौकात अनेकदा वाहने रोडवर उभी असतात त्यामुळे संपूर्ण ट्रॅफिक जाम होत असतो. तर अनेकदा रुग्णवाहिका ला जाण्याकरिता कसरत करावी लागते. तसेच तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे बाहेर गावातील नागरिक अनेक शासकीय कामानिमित्त इथे येत असतात.त्यात मुख्य म्हणजे शेंडा मार्गावर अनेक शासकीय कार्यालय आहेत तसेच नागरिक, कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी आवागमन करीत असतात.
शेंडा मार्ग हा रुंद झाल्यामुळे अनेकदा काही नाबालिक मुले आणि किशोर वयातील मुले कर्न कर्कश सांयलेंसर चे जोरात आवाज करीत वाहने चालवत असतात. ह्यांच्या या हलगर्जी पणा मुळे अनेकदा अपघात झालेले आहेत. तर काही नव युवकानी आपले हात पाय गमवून कायमचे अपंग झाले आहेत.
वाहतूक नियमाना डावलून काही पालक वर्ग आपली वाहने नाबलीक मुलांच्या हाती देहून स्वतः आपली जबाबदारी विसरत आहेत.असल्या पालकांवर सुद्धा कारवाही ह:वायला पाहिजे.धूम स्टाईल ने बाईक चालवनाऱ्यांमुळे आता त्यांच्या स्वतःच्या व नागरिकांच्या जीवाला अपघात होहून जीवाला धोका निर्माण झाला आहे. यांवर अंकुश लावण्याची पोलीस विभागाकडून नागरिकांची मागणी होत आहे.