आज पुन्हा शनिवार,मोबाइल चोरांपासून सावधान!


MKM NEWS 24 – Dr.Sushil Lade
सडक अर्जुनी- 4 फेब्रुवारी 2023- हल्ली सडक अर्जुनी शहरात आठवडी बाजार आला की मोबाईल चोरांची दिवाळीचं असते. सडक अर्जुनी चा आठ वाडी बाजार हा चांगलाच प्रसिद्ध आहे. आजू बाजू चे व्यापारी आणि शब्जी भाजी दुकानदार, फळ विक्रेते हे दुकान लावत असतात. तालुक्यातील नागरिक ह्या बाजारात बाजार करण्या करीता येत असतात. बाजारात चांगलीच गर्दी असते.

ह्या गर्दीचा फायदा घेत काही महिन्यांपासून मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही महिन्यापासून बाजारात मोबाईल चोरी वाढली आहे. कित्येक नागरिकांचे महागडे मोबाईल वर चोरट्यांनी आपले हाथ साफ केले आहे.गेल्या दोन तीन महिन्यापासून आता पर्यंत तर अंजादे 30 ते 40 मोबाईल चोरी गेल्याचे सांगितले जाते.
पोलीस विभागाने आता आठवडी बाजारात गस्ती वाडविण्याची मागणी नागरिक करीत आहेत. तर नागरिकांनी सुद्धा आपली जबाबदारी समजून घेहून मोबाईल फोन जपून ठेवायला हवा. काही नागरिक चक्क फॅशन समजून मोबाईल हातात धरून बाजार करीत असतात त्यात मोबाईल चोरांना तर खुले आमंत्रणच असते. तर काही नागरिक वरच्या खिश्यात मोबाईल ठेवत असतात याचा फायदा मोबाईल चोरांना होत ते मोबाईल चटकन काढून मोबाईल चोरत असतात. नागरिकांनी ह्या बाबी कडे लक्ष देत आपली जबाबदारी समजून घेण्याची गरज आहे.