खोबा नाल्याजवळ भीषण अपघातात मोटार सायकल सवार जागीच ठार
MKM NEWS 24 –
सडक अर्जुनी- 5/2/23- डूग्गीपार पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कोहमारा नवेगाव बांध मार्गावरील खोबा नाल्याजवळ ( शेत शिवारात) बोलेरो गाडी द्वारा मोटार सायकल सवाऱ इस्मास धडक झाली असून मोटार सायकल सवार जागीच ठार झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोटार सायकल क्रमांक MH35-AE- 0191 वर दिगांबर परसराम पुस्तोडे राहनार मौजा रेंगेपार, तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया, असून हा नवेगाबांध कडून आपल्या स्वगावी परत येत होता तर बोलेरो गाडी क्रमांक (MH46 -BF- 5302 ) ही नवेगाव बांध कडे जात होती. धडक एवठी जबर होती की मोटासायकलस्वार च्या डोक्याला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटना स्थळी डूग्गिपार पोलीस दाखल झाले असून घटनेचा पंचनामा करून बॉडी ला शवविच्छेदन ( पोस्टमार्टम) करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे पाठविण्यात आली. तर बोलोरो गाडी ही पोलीस स्टेशन डूग्गीपार येथे जमा करण्यात आली. पुढील तपास डूग्गिपार पोलीस करीत आहेत.