सडक अर्जुनी – धूम स्टाईल ने बाईक चालविणाऱ्या 7 व्यक्तींवर गुन्हे दाखल
धूम स्टाईल ने बाईक चालविणाऱ्या 7 व्यक्तींवर गुन्हे दाखल ,कलम 279 ची कारवाही
सडक अर्जुनी – 6/2/23- डूग्गिपार पोलिसांन द्वारे भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या विरुद्ध धडक कारवाही ची मोहीम राबविण्यात आली. दिनांक 3 फेब्रुवारी रोजी MKM news 24 ने ,” सडक अर्जुनी शहरात धूम स्टाईल मुळे नागरिकांच्या जीवाला धोका”, https://mkmnews24.in/10720/ ,
या मधड्या खाली बातमी प्रकाशित केली होती. ह्या बातमीची दखल घेत डूग्गिपार पोलीस विभागाने वेगाने वाहने चालवत असणाऱ्या इस्मान वर कारवाहीचा धडाका राबवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
पोलीस स्टेशन डूग्गिपार हद्दीत बेदकारपणे ,भरधाव वेगाने वाहन चालवून अपघाताचे वाढ होत असल्याने डूग्गीपार पोलीस स्टेशन चे थाणेदार आर.के. सिंगळजुळे यांनी दिनांक 4 ते 5 फेब्रुवारी 2023 रोजी पर्यंत अशा वाहन चालका विरुद्ध विशेष मोहीम राबवून पोलीस स्टेशन चे हद्दीत धोकादायक ,भरधाव वेगाने आणि बेदकारपणे वाहन चालविणाऱ्या एकूण 7 इस्मांवर कलम 279 भादवी प्रमाणे गुन्हे नोंद करून कायदेशीर कारवाही करण्यात आली.
या कारवाही मुळे कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या आणि वेगाने वाहने चालवत असणाऱ्यानवर चांगलाच धाक निर्माण झाला आहे.
सदर मोहीम कारवाही पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली डूग्गीपार पोलीस स्टेशन द्वारे करण्यात आली.