Sunday, August 24, 2025
क्राइमगोंदिया

कॉलेज विद्यार्थीनिला ब्लॅक मेल करणारा तो सडक छाप रोमिओ पोलिसांचे ताब्यात

कॉलेज तरुणीची (विदयार्थीनीची) अश्लील मेसेज करून छेड काढणा ऱ्या, धमकावणाऱ्या रोमियो ला अटक, गुन्हा नोंद दामिनी पथकाची उल्लेख नीय कामगिरी

गोंदिया- प्रकरण अशा प्रकारे आहे की, एका 19 वर्षीय कॉलेज तरुणीस एक तरुण (रोमियो) मागील 02 महिन्यापासून सतत कॉलेज तरुणीच्या मोबाईल क्रमांका वर डार्क वेबचा वापर करून, इंटरनेट कॉलिंग, कॉल बॉम्बिंग, स्पूफ कॉलिंग, बल्क मेसेजिंग , इमेज मोर्फिंग, सायबर स्टॉकिंग इत्यादी तंत्रज्ञान विषयक वेगवेगळ्या माहिती चा उत्तमरित्या वापर करून आंतरराष्ट्रीय क्रमांकादवारे कॉल करून, Watts APP वर फोन, अश्लील मैसेज करून लैगिक सुखाची मागणी करून, तसेच ब्लॅक मेल करून तरुणीस मानसि क त्रास देत होता. तसेच तरुणीने त्याच्या गोष्टींना वारंवार नकार व विरोध करून सुध्दा तरुण हा तरूणीस, तसेच तिच्या घरच्यांना त्रास होईल, तसेच समाजात तरुणीची बदनामी करण्याचे क्षडयंत्र करीत होता. या बाबत सदर तरुणी ने कंटाळून पोलीसांकडे तक्रार केली होती.

सदर ची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सदर तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेवून मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया अशोक बनकर यांनी तरूणीस, (विद्यार्थिनीस) त्रास देणाऱ्या तरुणास ( रोमियो) यास तात्काळ ताब्यात घेवून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्या बाबत निर्देश देवून आदेशित केले होते.

या अनुषंगाने मा.वरिष्ठांचे निर्देश व आदेशान्वये व मार्ग दर्शनाखाली दामिनी पथका तील प्रभारी म.पो.उप.नि प्रियंका पवार, यांचे मार्गदर्श नात पो.शि अंबादे,बावणकर, चा.म.पो.शि.पाचे, पो. शि.सपाटे,भैसारे यांनी तरुणीच्या तक्रारीची शहानि शा केली असता दिनांक 6-02-2023 रोजी तरुणाने तक्रारदार तरुणीस आंतर राष्ट्रीय क्रमांकादवारे कॉल करून, एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले असता दामिनी पथकाने सापळा रचून त्या तरुणास रंगेहाथ पकडले. व ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणास विद्यार्थिनीच्या तक्रारीच्या अनुषंगाने जबाबा वरून त्रास देणाऱ्या तरुण रोमिओ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कामगीरी मा. वरिष्ठांचे निर्देश व आदेश्यां न्वये दामिनी पथकातील प्रभारी म.पो.उप.नि प्रियंका पवार, यांचे मार्गदर्शनात पोशि. अंबादे, बावणकर, मचापोशि. पाचे पो.शि. सपाटे, भैसारे यांनी उल्लेख निय कामगीरी केलेली आहे. मा.वरिष्ठांनी उल्लेख खनिय कामगीरी करणाऱ्या पो. अधिकारी पो.अंमलदार यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

वरील घटनेच्या अनुषंगाने गोंदिया जिल्हा पोलीस दला तर्फे जिल्ह्यातील संपूर्ण जनतेला विशेषतः पालक वर्ग व मुलींनी या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. असे जाहीर आवाहन करण्यात येते.

error: Content is protected !!