Sunday, August 24, 2025
सड़क अर्जुनी

नशिब बलवान म्हणून वाचले परशुराम? , अपघातात गंगाधर परसुरामकर किरकोळ जखमी!

MKM NEWS 24 -Dr. Sushil Lade
सडक अर्जुनी – 8/2/23 – राष्ट्रवादी काँग्रेस गोंदिया चे जिल्हाध्यक्ष गंगाधर परसुरामकर आणि नवनिर्वाचित सरपंच ग्रामपंचायत खोडशिमनी यांचे मुरदोली जंगला मध्ये अपघात झाला.

सविस्तर वृत्त असे की, गंगाधर परसुरामकर आणि यांचे सहकारी माजी. जि.प.सदस्य किशोर तरोंने हे गोंदिया ला एका लग्न समारंभा करीता गेले होते. गोंदिया वरून ते आपल्या मारोती स्विफ्ट कार ने रात्रीला परत येत होते. काल दिनांक 7 फेब्रुवारी ला रात्री 9.30 वाजता मुरदोली येथील जंगलात रस्त्याच्या कडेला कोंबड्यांची गाडी (ट्रॅक) बंद अवस्थेत उभा होता. त्या ट्रकला कोणत्याही प्रकारचे इंडिकेटर (चेतावणी संकेत) लावलेले नव्हते. रात्री ला कार समोर अचानक उभा असलेले ट्रक न दिसल्यामुळे हा अपघात घडला.

ट्रक ला असलेले साईड अँगल हा मारोती स्विफ्ट कार च्या समोर च्या साईड ला अडकला आणि संपूर्ण दरवाजा उखडक्या गेला. ह्यात रहस्य हे आहे की, गंगाधर परसुरामकर हे प्रत्येक वेळेस सामोर च्या सीटवर बसले असतात. परंतु ह्या वेळेस ते किशोर तरोने सोबत मागच्या सीटवर बसलेले असल्यामुळे बचावले.

म्हणाव तर “नशिब बलवान म्हणून वाचले गंगाधर परसुरामकर” . ह्या अपघातात त्यांच्या कार क्षतिग्रस्त झाली असून परसुरांमकर यांच्या डोक्याला डोळ्या जवल चस्म्याची फ्रेम लागून गंभीर दुखापत झाली आहे तर ते सध्या सुखरूप सुरक्षित आहेत. तर त्यांचे सहकारी किशोर तरोने आणि त्यांचे वाहन चालक हे दोघेही सुखरूप बचावले आहेत.

सांगायचे म्हणजे गोंदिया कोहमारा मार्गावर रात्रीच्या वेळेस कित्येक ट्रक, ट्रॅक्टर, यांच्या मागचे टेल लाईट हे बंद असतात तर कोणत्याही प्रकारचे इंडिकेटर सुरू न करता वाहने रोड च्या कडेला उभे केलेले असतात. त्या कारणाने असले अपघात हे नित्य नेहमी घडत असतात. पोलीस विभागाने सज्ज राहुन असल्या वाहन चालविणाऱ्या वर कारवाही करण्याची नितांत गरज आहे.

error: Content is protected !!