Sunday, August 24, 2025
सड़क अर्जुनी

तहसील कार्यालयात जिथे तिथे खर्र्याच्या पिचकाऱ्या, तहसीलदार साहेब ऑफिस आहे की पानटपरी!

तहसील कार्यालयातील पिण्याच्या पाण्याचे वॉटर फिल्टर
तहसील कार्यालयातील पिण्याच्या पाण्याचे वॉटर फिल्टर

तहसील कार्यालयात जिकडे तिकडे खरर्याच्या पिचकाऱ्या, तहसीलदार साहेब ऑफिस आहे की पानटपरी!
सडक अर्जुनी – डॉ.सुशील लाडे -सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा कायद्याने अपराध आहे. यासाठी दंडात्मक कार्यवाहीचे प्रावधान आहे. परंतु, याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे नियम फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहेत. सडक अर्जुनी येथील सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालयाच्या भिंती, कोपरे थुंकीने रंगले आहेत.  त्यामुळे कायदे आहेत, पण अंमलबजावणीचे काय? असा सवाल नागरिक करीत आहेत.

तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेले कार्यालय म्हणजे तहसील कार्यालय. तालुक्यातील विविध गावातील नागरिक तहसील कार्यालयात विविध प्रकारच्या शासकीय कामाकरीता रोजच येत असतात. तहसील कार्यालयात महसूल विभागाचे विविध केबिन आहेत.

(कायदे आहेत, पण अंमलबजावणीचं काय?, शासकीय कार्यालयातील पिचकाऱ्या कायमच!)

विविध शासकीय कामाला लागणाऱ्या कागदपत्रांसाठी तालुक्यातील नागरिकांचे रोजच आवागमन होत असते. कित्येक शालेय विद्यार्थी, महिला वर्ग ह्या कार्यालयात शासकीय कामा निमित्त येत असतात.

तहसील कार्यालयात प्रवेश केल्याबरोबर आत मधल्या रिकाम्या जागेवर जागोजागी चक्क खर्याच्या पिचकाऱ्या, सुपाऱ्या, पहावयास मिळतात.

कार्यकायात येणाऱ्या  नागरिकाला कारवाहीची भीती नसल्या मुळे ते खुले आम तहसील कार्यालयात खररा खावून जागा मिळेल त्या जागो जागी थुंकत असतात. पिण्याच्या पाण्याचा जागी सुद्धा खरर्याच्या पिचकाऱ्या पहावयास मिळतात.

तर कार्यालयाचे शौचालय हे नित्य नियमाने साफ सफाई होत नसल्यामुळे तहसील कार्यालयात घान वाश येत असते त्यामुळे महिला वर्गाला खूप त्रास सहन करावा लागतो. ह्या सर्व बाबी कडे तहसीलदार साहेबाने गांभीर्याने लक्ष देउन तहसील कार्यालय परिसरात खर्रा, पान खाऊन थुकणाऱ्यांवर कारवाही करण्याची आवश्यकता आहे.

error: Content is protected !!