सडक अर्जुनी शहरात 51 तरुणांनी रक्तदान करून शिवजयंती केली उत्साहात साजरी
सडक अर्जुनी – MKM news 24 – महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त तालुक्यातील शिवजन्मोत्सव सोहळा समिती सडक अर्जुनी तर्फे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा तसेच पोवाडा स्पर्धा घेण्यात आली. तालुकास्तरीय सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीत मोठ्या उत्साहाने भाग घेतला. त्याचप्रमाणे तालुक्यातील 51 तरुणांनी रक्तदान करून छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली.
कार्यक्रमाला शहरातील सर्व शाळांचे प्राध्यापक, विद्यार्थी, पालक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शहरातील नगरसेवक होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर कोरे आणि निशा गजभिये यांनी केले असून कार्यक्रमाचे आभार समितीचे सल्लागार कपिल हेडाऊ यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य श्री राजकुमार हेडाऊ सर होते तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री दिलीप चाटोरे सर होते. तसेच कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्राचार्य ए पी मेश्राम सर, प्राचार्य रिता लांजेवार मॅडम, प्राचार्य रुपाली बिसेन मॅडम आणि गुगल कॉम्पुटर चे संचालक जितेंद्र ब्राह्मणकर हे होते.
गावातील सर्व व्यापारी बंधूंनी सदर कार्यक्रमात देणगी देऊन कार्यक्रमाला हातभार लावला. शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष अविरत पुरी, उपाध्यक्ष उमेश उदापुरे, सचिव प्रवीण पतोले, मुख्य सल्लागार नितेश कोरे, कपिल हेडाऊ, संघटक रोशन गहाणे, सचिन बरसागडे, ओम गहाणे, विक्रम पुरी, जितेश शेंडे, आकिब पटेल यांच्या प्रयत्नांनी कार्यक्रम सुव्यवस्थेत पार पडले.
याच कार्यक्रमात शहरातील नगराध्यक्ष तसेच नगरसेवक यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी जागा निश्चित करून देण्यासाठी निवेदन दिला. नगराध्यक्ष च्या वतीने नगरसेवक अंकित भेंडारकर, गोपी खेडकर, राजेंद्र हेडाऊ, महेंद्र वंजारी, असलेश अंबादे आदी उपस्थित नगरसेवकांनी निवेदन स्वीकारून स्मारक उभारण्याकरिता जागा निश्चित करून देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादीचे आयोजन करण्यात आले होते. गोपाल तिवारी, शुभम येसनसुरे, मोनू उक्कणकर, होमेंद्र गव्हाणे सचिन वंजारी, शुभम निखारे, चिंटू चर्जे, आधी समिती चे सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते.