ग्राम.कोहमारा येथे सव्वा दोन कोटींचा कोल्हापुरी बंधारयाचे चंद्रिकापुरे यांचा हस्ते भूमिपूजन
सडक/अर्जुनी- मौजा कोहमारा ता सडक/अर्जुनी येथे शशीकरण नाल्यावर कोल्हापुरी बंधारा बांधण्याकरीता अनेक वर्षा पासून कोहमारा, कोसबीतील स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीवरून आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा प्रयत्नामुळे मंजुर झाला आहे. कोहमारा ते वडसा रस्त्यावरील पुलापासून सुमारे 100 मीटर अंतरावर कोल्हापुरी बंधारा सिमेंट काँक्रीटचा संधानकात बांधकाम होणार आहे.
या बंधाऱ्याच्या भूमिपूजन दिनांक २२/०२/२३ बुधवार रोजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा शुभ हस्ते.प्रमुख उपस्थिती राकाँप जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, राकाँप तालुका अध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, जि. प. सदस्य कविताताई रंगारी. प.स. शिवाजी गहाणे, माजी सभापती जि. प राजेश नंदागवळी, शिवसेना जिल्हा युवा अधिकारी महेश डुंभरे आदी. मान्यवरांच्या उपस्थित भूमिपूजन सोहळा पार पडला.
सदर प्रकल्पाची अंदाजीत किंमत 232.27 लक्ष इतकी असून. या बंधाऱ्यापासुन 75.00 हे. सिंचन क्षमता प्रस्थावित आहे. सदर बंधाराकरिता पाणलोट क्षेत्र 45.75 चौरस किमी आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी एकूण येवा 15. 86 दलघमी आहे. साठवण क्षमता 180.32 सघमी मीटर असणे अपेक्षित आहे. बंधाऱ्याची एकूण लांबी 39 मीटर असून एकूण 13 ओपनिंग आणि 12 पायर्स आहेत. प्रत्येक ओपनिंगची रुंदी 2.0 मीटर आहे. उंची 3.00 मी. प्रत्येक ओपनिंगमध्ये लोखंडी फळ्या बसविण्याची नियोजित आहे. सदर लोखंडी फळ्या ह्या शासनाने नेमून दिलेल्या नियोजनानुसार 15 जून पूर्वे काढायच्या असून 15 ऑक्टोंबर पर्यंत लावायचे आहेत.
बंधाऱ्यात 3.10 मी. रुंदीचा रस्ता असून येण्या जाण्याकरिता सुद्धा लाभधारकांना फायदेशीर ठरणार आहे. सदर योजनेच्या लाभ कोहमारा तसेच कोसबी या गावातील शेतकऱ्यांना होणार असून प्रकल्पामुळे शेतीतील उत्पादनात वाढ होईल तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यास सुद्धा मदत होईल.
याप्रसंगी प्रतिभा भेंडारकर सरपंच कोहमारा, लांजेवारताई सरपंच कोसबी, दुलाराम चंद्रिकापुरे सेवा सेवानिवृत्त उपसचिव, उज्वल चौधरी, सविताताई बडोले, शिवदास साखरे, नंदू गहाणे आदी सह कोहमारा व कोसबीतील ग्रामस्थ उपस्थित होते.