माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या पाठपुराव्याला यश, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी ३६ कोटी ३३ लाखांचा निधी मंजूर
अर्जुनी मोरगाव : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) (DPC) तसेच आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्य च्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा – २ अंतर्गत एकूण ३६ कोटी ३३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
प्रशासकीय मान्यता शासन परिपत्रक क्र. मुग्रायो-2022/प्र.क्र.596 /बांधकाम-४ व मुग्रायो-2023/प्र.क्र.246 /बांधकाम-४ नुसार प्रदान करण्यात आलेली आहे.
परिपत्रकानुसार एकूण ७ रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी निधी मंजूर करण्यात आलेला असून यात रा.मा. – 753 ( डव्वा) ते मुंडीपार TR-06 रस्त्यासाठी ३ कोटी १ लाख ३१ हजार रुपये, रा.मा. – 753 (पळसगाव) ते जांभळी MRL-01 रस्त्यासाठी ४ कोटी १६ लाख ४७ हजार रुपये असे एकूण एकूण ७ कोटी १७ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) च्या माध्यमातून देण्यात येणार आहे. SH-366 ते सिलेझरी ते बाक्टी रस्ता MRL-10, VR-2 साठी २ कोटी ३० लाख ८७ हजार रुपये, SH-358 ते बाक्टी गुढरी रस्ता MRL-11, ODR-111 साठी ४ कोटी ७७ लाख ९१ हजार रुपये, इलदा भरनोली तिरखुर्री रस्ता TR-03, ODR-126 साठी ८ कोटी ८४ लाख ६९ हजार रुपये, NH-753 आंबेतलाव रस्ता TR-03, ODR-69 साठी १२ कोटी ४ लाख १५ हजार, NH-753 मुंडीपार तिल्ली रस्ता TR-07, ODR-70 साठी ५ कोटी १८ लाख ५६ हजार रुपये असे एकूण २९ कोटी १६ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून आशिया विकास बँक (ADB) अर्थसहाय्यच्या माध्यमातून देण्यात येतील.
सदर कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या बद्दल राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या वतीने आभार मानले आहे.