Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था डव्वा येथे अध्यक्ष – उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड

सडक अर्जुनी – आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित- डव्वा रजी. नंबर 1334 या संस्थेच्या नुकताच पार पडलेल्या संचालक पदाच्या निवडणुका यामध्ये शेतकरी विकास पॅनलचे दणदणीत विजय झाला. शेतकरी विकास पॅनल चे 13 पैकी 13 ही संचालक निवडून आले.

त्यानंतर दिनांक 18 /4 /2023 ला पहिली सभा बोलावून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकारी हर्षल काडीकर सहाय्यक निबंधक यांच्याकडे होती.

निवड प्रक्रिया पार पाडण्यात आले यामध्ये अध्यक्ष पदावर मधुकर झिंगरजि गावराने तर उपाध्यक्ष पदी देवीलाल अनंतराम कटरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीची प्रक्रिया पार पाडत असताना संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते. तसेच सहकारी करणारे सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते.

त्यात डॉ. भुमेश्वर पटले, जी. प. सदस्य, शालिंदर कापगते उपसभापती प.स, चेतन वडगाये प. स.सदस्य,  योगेश्वरी चौधरी सरपंच डव्वा,अनिल बिलिया, रूप विलास बापू कुरसुंगे, रमेश बडोले , सुनीलजी घासले,सोहन चौधरी, राकेश जैन, सचिन रहांगडाले,चंदन फरदे, हरिचंद्र लांजेवार, संस्थेचे सचिव मनीष सोनवणे, नीरज पारधी पूर्व सचिव, व संस्थेचे कर्मचारी रोहित कुरसंगे, संतोष लामकासे गणेश वळगाये इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!