Sunday, August 24, 2025
क्राइमगोंदिया

अवैधरित्या वाळूचे उत्खनन व चोरी प्रकरणी गुन्हा नोंद, दोन टिप्पर सह, 7 ब्रास वाळू किंमती 35 लाख 35 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

गोंदिया – पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, यांनी गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे , दारू, मटका, जुगार, रेती चोरी धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्या बाबत स्थानिक गुन्हे शाखे चे पोलीस निरीक्षक श्री . दिनेश लबडे यांना निर्देश देवून कारवाई करण्या बाबत आदेशित केले होते.

त्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर, यांचे निर्देशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे ,यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पथकाची जिल्ह्यात अवैध धंदयांविरुध्द धाड मोहिम राबविण्यात येत असून धडक कारवाई करणे सुरू आहे.

या अनुषगाने स्था गु. शा. पथकास गोपनीय बातमीदार याचे कडून खात्री लायक बातमी मिळाली की, रात्र दरम्यान पोलीस ठाणे- डूग्गीपार हद्दीतील चुलबंद नदीच्या पात्रात काही लोक अवैध रित्या रेतीचे उत्खनन करून वाळूची चोरी करून वाहतूक करीत आहेत अश्या खात्रीशीर माहिती च्या आधारे आज दिनांक – 20/04/ 2023 रोजी स्था.गु.शा.पोलीस पथकाने सापळा रचून वाळूचे उत्खनन व चोरी करणाऱ्या ना अवैधरित्या वाहतूक करतांना कोहमारा ते देवरी कडे जाणाऱ्या हायवे रोड वरील शशिकरण पहाडी घाट परिसरात छापा घालून धाड कारवाई केली असता-

चुलबंद नदी पात्रातून अवैधरित्या गौण खनिज वाळूचे उत्खनन करून वाळूची चोरी करून वाहतूक करतांना मिळून आल्याने 2 वाहणे (10 चाकी अशोक लेलँड कंपनीचा हायवा वाहन, व 6 चाकी टिप्पर किंमती 35 लाख रु ) आणि 7 ब्रास वाळू किमती 35 हजार रु.  असा एकूण किंमती 35 लाख 35 हजार/-* रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर प्रकरणी हायवा व टीप्पर चालक मालक आरोपी नामे

1) महेश शंकर डुंबरे वय 40 वर्ष रा. वार्ड क्र.03 कोहमारा

2) विशाल बाबुलाल रहिले वय 25 वर्षे रा. भरेगाव ता. देवरी जि. गोंदिया

यांचेविरुद्ध अवैध रित्या वाळूचे उत्खनन करून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता शासनाचा महसूल बुडवून रेतीची चोरी प्रकरणी पोलीस ठाणे डूग्गीपार येथे कलम 379 भारतिय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीतांना अटक करण्यात आलेली असून डूग्गीपार पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास डूग्गीपार पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक , गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर, यांचे आदेशान्वये पो. निरीक्षक श्री. दिनेश लबडे , यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप. नि.महेश विघ्ने,सहा.फौज. अर्जुन कावळे, पो. हवा. भूवनलाल देशमुख, इंद्रजि त बिसेंन, पोशी- संतोष केदार, चा.पो.हवा.लक्ष्मण बंजार यांनी कामगीरी केलेली आहे.

error: Content is protected !!