Thursday, May 15, 2025
सड़क अर्जुनी

सार्वजनिक वाचनालयांना ग्रंथ वाटप आज, आमदार निधीतून ६० वाचनालयांना मिळणार ग्रंथ

सडक अर्जुनी – 15 मे 2023- आ. मनोहर चंद्रिकापुरे यांचे आमदार निधीतून मतदारसंघातील ६० शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना संदर्भ व सामाजिक ग्रंथ तसेच स्पर्धात्मक परीक्षेची पुस्तके वाटप केली जाणार आहेत.हा कार्यक्रम कोहमारा येथील एरिया ५१ मध्ये सोमवारी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे.

विद्यार्थ्यांना वाचनाची सवय जडावी,त्यांच्या ज्ञानात भर पडावी.गावागावातील वाचनालये अधिक समृद्ध व्हावीत,त्यांचा दर्जावाढ व्हावा यादृष्टीने आ मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपल्या स्थानिक निधीतून सार्वजनिक वाचनालयांना पुस्तकांचे संच वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमाअंतर्गत विधानसभा क्षेत्रातील अर्जुनी मोरगाव तालुका १८,सडक अर्जुनी तालुका ३१ व गोरेगाव तालुक्यातील ११ शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना ग्रंथ वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.यादीत नावे समाविष्ट असलेल्या ग्रंथालय चालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आ चंद्रिकापुरे यांनी केले आहे.

error: Content is protected !!