पुढची दहा वर्षे आयुष्याला वळण देणारी – मनोहर चंद्रिकापुरे
अर्जुनी मोरगाव – MKM NEWS 24 –दहावी,बारावी उत्तीर्ण झाले.पुढे उज्वल भविष्याची वाटचाल सुरू होणार आहे.जीवन आहे तिथपर्यंत शिकायचं आहे.योग्य क्षेत्राची निवड करा.यात गोंधळू नका. नाविन्यता व नेतृत्वगुण हे आगामी दहा वर्षातील प्रभावी माध्यम असतील.
ज्यांच्याकडे आहे ते भविष्यातील विजेते आहेत.संधी ओळखुन संधीचे सोने करा.आगामी दहा वर्षे तुमच्या जीवनाला कलाटणी देणारे आहेत.स्वप्नं बघा.यशस्वीतांचे यश बघून प्रेरित व्हा.क्षणिक सुखाच्या मागे न धावता भावी जीवनाची वाटचाल सुकर करा असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
ते रविवारी स्थानिक प्रसन्न सभागृहात आयोजित गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमात बोलत होते. *यावेळी मार्गदर्शक म्हणून गोंदियाचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव श्याम तागडे,नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ राजन गजभिये,नागपूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आर पी बोरकर, अमित उंदिरवाडे, उद्योजक राहुल जवादे,चार्टड अकाउंटंट राजेश चतुर,निवृत्त उपसचिव दुलीराम चंद्रिकापुरे, मंजू चंद्रिकापुरे उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी विद्यार्थ्यांत जोश भरला.आकडे महत्त्वाचे नाहीत.तुमच्यातील कुशलता महत्त्वाची आहे.प्रत्येकाने उत्कृष्ट विद्यार्थी बनायचं. विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी मेहनत घेतली पाहिजे. अपयशाने खचून जाऊ नका.वेळेचे योग्य नियोजन करा.कुठल्या कार्याला किती वेळ द्यायचा त्याचे प्राधान्यक्रम ठरवा.सर्वत्र स्पर्धा आहे.तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर शिक्षकांशी करा.तुमच्या यशाने शिक्षक खुश होतील.त्यानंतर देवाशी स्पर्धा करा.देव होऊ शकले नाही तरी तुम्ही सक्षम व्हाल असे मार्गदर्शन केले.
डॉ बोरकर म्हणाले ,ही तुमच्या उच्चतम यशाकडे धावण्याची सुरुवात आहे.मोठी स्वप्न बघा.जिद्द,मेहनत असली पाहिजे. अमित उंदिरवाडे म्हणाले,कमीपणा बाळगू नका.योग्य करिअरची निवड करा.भविष्यात भरपूर संधी असतात.माहितीचा अभाव असतो.आत्मविश्वास असला पाहिजे.अपयश पचविण्याची शक्ती ज्यात असते त्याला यश मिळतेच.झालेल्या चुकांच आत्मनिरीक्षण करा.
डॉ गजभिये म्हणाले, व्यवसायात कामाचं समाधान मिळालं पाहिजे.वैद्यकीय व्यवसायात रुग्ण सेवा आली.वेदनांवर उपचार करावे लागतात.जेव्हा रुग्ण वेदनामुक्त होतो,तो आनंद वेगळाच असतो.रुग्णाल बरे झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जेव्हा हास्य फुलतं, यापेक्षा दुसरा जॉब सॅटीसफँक्शन इतर कुठल्याही व्यवसायात नसतो.
*यावेळी यूपीएससी परीक्षेत यश संपादन करणारा अमित उंदिरवाडे याचा सत्कार करण्यात आला* . नागपूर परीक्षा मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवंत ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उर्वरित विद्यार्थ्यांना घरपोच स्मृतिचिन्ह देण्यात येणार असल्याची माहिती आ चंद्रिकापुरे यांनी दिली.कार्यक्रमाचे संचालन केंद्रप्रमुख सुरेंद्र भैसारे यांनी केले. तर प्रस्तावना प्रा.मंजू चंद्रिकापुरे यांनी केले.