Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले साहेब यांनी घेतली वाघाडे कुटुंबाची सांत्वत भेट

सडक अर्जुनी –21 जुलै रोजी तालुक्यातील ग्राम घाटबोरी/तेली येतील शेतकरी ओमदास सखाराम वाघाडे वय 55 यांचा वीज पडून आकस्मिक मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच माजी सामाजिक न्याय मंत्री मा. राजकुमार बडोले साहेब , मा. सौ .निशाताई तोडाशे जिल्हा परिषद सदस्या सौंदड ,मा .सालींदर कापगते उपसभापती प.स स/अर्जुनी श्री. शुभम जनबंधु ग्रा.पं सदस्य सौंदड यांनी वाघाडे परिवाराची सांत्वत भेट घेतली.

घरचा करता व्यक्ती गेल्याने वाघाडे परिवारावर एक मोठे संकट आले.या संकटातून सावरण्यासाठी त्यांना शक्ती मिळो अशी प्रार्थना केली .शासना मार्फत वाघाडे परिवाराला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार अशी ग्वाही दिली . यावेळी श्री. देवानंद वंजारी सरपंच घाटबोरी तेली ,सौ.भुमिता बाळबुद्धे सरपंच घाटबोरी /कोहळी , शेखर वंजारी, सुरेश वंजारी,पांडुरंग राऊत, जितेंद्र वंजारी, तुळशीराम भिवगडे व गावकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!