Sunday, August 24, 2025
सड़क अर्जुनी

युवक कॉंग्रेस च्या वतीने मनोहर भिडे यांचा निषेध व्यक्त करत राज्यपालांना निवेदन

स./अर्जुनी :- राष्ट्रपिता महात्मा गांधी महात्मा ज्योतिराव फुले तसेच साईबाबा यांसारख्या महापुरुषांवर व भगवानावर आक्षेपार्य वक्तव्य करण्याच्या निषेधार्थ अर्जुनी/मोर. विधानसभा युवक कॉंग्रेस च्या वतीने मनोहर भिडे यांचा निषेध नोंदवून तहसीलदार व ठाणेदार यांच्या मार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले.

आपला राज्य हा पुरोगामी आहे. आपल्या राज्यामध्ये महापुरुषांचा वारसा आहे . अनेक महापुरुषांनी राज्याच्या जडणघडनी मध्ये मोठं योगदान दिलेलं आहे .आणि अशा महापुरुषांचा अपमान हे खपविल्या जाणार नाही . याकरिता युवक काँग्रेसच्या वतीने पुढाकार घेऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी गोंदिया जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष निशांत राऊत प्रामुख्याने उपस्थित होते . तसेच अर्जुनी./मोर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रेहान शेख, उपाध्यक्ष तन्वीर शय्येद, विस्मय बडोले ,विरु गौर, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर खोटेले  ,अजहर चिस्ती ,राहुल बारसागडे सचिन मोहुर्ले,  ललित खोटेले,  बाबू पठान, हर्षद सेलोकर, मंगेश बावणे ,नरेंद्र तागडे, सागर बावनकर ,मंगेश मोहूर्ले, राजा पठाण, रमेश किरसान व युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

error: Content is protected !!