सडक अर्जुनी शहरात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

MKM NEWS 24 – Dr. Sushil Lade
सडक अर्जुनी – 15 ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. अनेक क्रांतिकारी वीरांच्या आणि स्वातंत्र्य सेनानींच्या प्राणांच्या आहुतीनंतर, इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या भारतमातेने या दिवशी मोकळा श्वास घेतला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटलेल्या अनेक वीरांना स्मरून हा दिवस देशभरात सर्वत्र मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. सडक अर्जुनी शहरतातील विविध ठिकाणी मोठ्या जोश उत्साहात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून शाळा, कॉलेज, प्रशासकीय कार्यालये, विविध पक्षांचे कार्यालय ,निवासी सोसायट्या अशा सर्वच ठिकाणी तिरंगा फडकवून झेंडा वंदन करण्यात आले तसेच तंबाखू मुक्त सपथ घेण्यात आली.
विविध शाळा , कॉलेज ठिकाणी प्रभातफेऱ्या काढल्या गेल्या. या प्रभातफेरी दरम्यान स्वातंत्र्यदिनाच्या खास घोषणा दिल्या गेल्या. संपूर्ण शहरात स्वातंत्र्य दिनी अतिशय आनंदित वातावरण बघावयास मिळाले.
तहसील कार्यालय सडक अर्जुनी येथील ध्वजा रोहन तालुक्याचे दंडाधिकारी निलेश काळे यांच्या हस्ते पार पडले. त्याच प्रमाणे नगरपंचायत कार्यालय सडक अर्जुनी येथील ध्वजा रोहन कार्यक्रम उपाध्यक्षा वंदना डोंगरवार , दुर्गा चौक येथील सार्वजनिक झेंडा वंदन नगराध्यक्ष तेजराम मडावी यांच्या हस्ते पार पडले.
भारतीय जनता पक्ष कार्यालय सडक अर्जुनी येथील ध्वजा रोहन माजी.
सामाजिक न्याय मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांनी केले. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचें कार्यालय (एरिया 51) येथील ध्वजा रोहन तालुका अध्यक्ष डॉ.अविनाश काशिवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर्फे ( गिऱ्हेपुंजे राईस मिल पटांगण सडक अर्जुनी) येथील ध्वजा रोहन रजनी गिऱ्हेपुंजे ( म.ता.अध्यक्ष रा.का) यांनी केले.
काँग्रेस पक्षाच्या वतीने (पंडित जवाहरलाल नेहरू पुतळा) येथील ध्वजा रोहन तालुका अध्यक्ष मधुसूदन दोनोडे यांनी केलं. जि.हा.सडक अर्जुनी येथील ध्वजा रोहन जि.प.सदस्या चंद्रकला डोंगरावर यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सडक अर्जुनी येथील ध्वजा रोहन अंकित भेंडारकर सभापती सा. बां. न. प. यांनी केले. माॅ. सरस्वती बिगर शेती सहकारी पतसंस्था स. अ. संस्थेचे अध्यक्ष देवचंद तरोणे यांनी केलं. माॅ. भवानी पथ संस्था येथील ध्वजा रोहन अध्यक्ष शेषराव गिऱ्हेपुंजे यांच्यां हस्ते पार पडले.
त्याच प्रमाणे तालुक्यातील विविध ठिकाणी ध्वजा रोहन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.