सडक अर्जुनी तालुक्यातील चार कोतवालांना नियुक्ती पत्र
सडक अर्जुनी- तालुक्यातील चार जागांसाठी 83 उमेदवार तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बारा जागांसाठी 394 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. मात्र कोतवाल भरती परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप करीत परीक्षार्थ्यांनी आंदोलन व उपोषण केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी यांचे सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी वरुण शहारे यांनी ही परीक्षाच रद्द केली होती.
त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सोळा कोतवाल पदासाठी सरस्वती विद्यालयातील एकाच केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे च्या देखरेखी खाली व पोलीस बंदोबस्तात परीक्षा घेण्यात आली.
दिनांक 17 ऑगस्टला सडक अर्जुनी तालुक्यातील कोतवाल परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या 4 उमेदवारांना तहसीलदार निलेश काळे यांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
यामध्ये सडक अर्जुनी तहसील कोतवाल पदी नियुक्त उमेदवार
१.गोंधळे गणेश आनंदराव – तलाठी साझा -०५ बोपाबोडी,
२.लांजेवार भारती कृष्णा -तलाठी साझा -०९-खजरी,
३.कोरे राजेश ताराचंद -तलाठी साझा -११ पांढरी,
४.काटेवार पंकज दिलीप -तलाठी साझा -१४ रेंगेपार
यांना नियुक्ती पत्र देण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार निलेश काळे यांनी दिली.