नवेगावबांध संकुल परिसरात होणार सौंदर्यीकरण
अर्जुनी मोरगाव – 8/9/2023- नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान संकुल परिसरात प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत ४० लक्ष रुपयांची रस्ते व सौंदर्यीकरणाची कामे होणार आहेत.या कामांचा शुभारंभ आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी गुरुवारी केला.
या कार्यक्रमाप्रसंगी जि प सदस्य रचना गहाणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे,पं स सदस्य संदीप कापगते, सरपंच हिरा पंधरे, उपसरपंच रमण डोंगरवार, शालीक हातझाडे,विनोद नाकाडे,व्यंकट खोब्रागडे, कोमल डोंगरवार, सुनीता येडाम,हेमलता गावड, व ग्रामस्थ उपस्थित होते.
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान,व्याघ्र प्रकल्प व संकुल परिसर देशातील पर्यटनाचे केंद्र आहे. गेल्या काही वर्षांत या पर्यटनस्थळाची अधोगती झाली होती.खा प्रफुल्ल पटेल यांनी यासाठी भरीव निधी दिला.आता कुठे हे पर्यटन स्थळ विकसित होत आहे.गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांच्या संख्येत सुद्धा वाढ होत असल्याचे विचार आ चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.