पांढरी येथील नागरीकांनी आ. चंद्रिकापुरे यांना केली रेल्वेमार्ग करुण देणेची मागणी
सडक/अर्जुनी – तालुक्यांतील गोंगले /पांढरी रेल्वेस्टेशन क्षेत्रात रेल्वेरुळावरूण नागरीकांच्या येण्या-जाण्यासाठि असलेली रेल्वेगेट रेल्वेप्रशासनानी मागिल दोन वर्षापासुन बंद केल्यामुळे रेल्वेस्टेशंच्या पलीकडे वास्तव्यास असलेल्या नागरीकांचा येण्या-जाण्यासाठी मार्गच बंद झालेला आहे. रेल्वे स्टेशन पासुन 2 किलोमीटर पेक्षा लांब असलेल्या भुयारी मार्गातुन सद्या ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे रुग्णांना दवाखान्यात जाण्यास व लहान मुलांना शाळेत जाण्यास 5 किलोमीटर चा प्रवाश करावा लागतो. सबब पुर्वीप्रमाणेच रेल्वेमार्ग करुण देणेची नागरीकांची मागणी घेऊन पांढरी येथील नागरीकांनी मा.आनदार मनोहर चंद्रिकापुरे यांची कार्यालयात दिनांक ०८ सप्टेंबर २०२३ रोजी कार्यालयात भेट देऊन निवेदन दिले .
भुसारी मार्गाचे काम रेल्वे करण्यास तयार आहे.मात्र त्यासाठी येणारा खर्च राज्य शासनाने प्रथम रेल्वे प्रशासनाकडे जमा करावा अशी अट घातली आहे. सबब सधारणत: रु दिड ते दोन कोटी एवढा निधी राज्य शासनाकडुन प्राप्त करुण देण्यासाठी मा.ना.श्री.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांना भेटुन निधी मंजुर करण्यात येईल असे आश्वासन मा.आमदार यांनी नागरिकांना दिले .
यावेळी कुषी उत्पन्न बाजार समिती संचालक डी. यु रहांगडाले, सरपंच गोगले श्यामकला करचाल, डॉ. पारधी , श्याम गजबे, विनोद खोबरे, तेजराम भोयर, सेवक भोयर, नोवित भोयर, ज्योती अंबुले, गीता भोयर , कचराबाई राऊत, ओमकार हटवार,वनिता प्रधान, मालान भोयर, लीला गुंडरे, अंतकला बागडकर, ताराबाई राऊत, तसेच पांढरीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.