सौंदड येथे गणेशोत्सव निम्मित पोलिसांचे रूट मार्च!, शांतता राखण्याचे आवाहन
सडक अर्जुनी – पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, यांचे संपूर्ण नियंत्रणात आणि मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक, कॅम्प देवरी अशोक बनकर, यांचे संपूर्ण देखरेखीखाली गोंदिया जिल्ह्यातील 4 उपविभागातील उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे नेतृत्वात व नियंत्रणात उपविभाग अंतर्गत असलेल्या एकूण 16 पोलीस ठाणे चे ठाणेदार, प्रभारी अधिकारी यांचे संपूर्ण देखरेखीखाली यावर्षी जिल्ह्यातील गणेशोस्तव पार पाडण्यात येणार आहे.
सविस्तर असे की, आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने डूग्गीपार पोलिस ठाणे हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी या करीता सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे (दि.18 ला) पोलिसांचा रूट मार्च घेण्यात आला.
पोलीस स्टेशन डुग्गीपार अंतर्गत आगामी उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मौजा सौंदड येथिल लोहिया शाळा, संविधान चौक, गावात जाणारा मुख्य मार्ग, बाजार लाईन, दुर्गा चौक, हनुमान मंदीर चौक, बौध्द विहार येथून रूट मार्च करण्यात आले. सदर रूट मार्च दरम्यान पो.नि. आर. सिंगनजुडे सा.,सपोनि प्रमोद बांबोळे, १९ पोलिस अंमलदार, ०५ स्ट्रायकिंग फोर्सचे अंमलदार व १२ गृहरक्षक हजर होते.