आमदार चंद्रिकापुरेंची लंजे दाम्पत्य यांच्या कुटुंबीयांची भेट
सडक अर्जुनी – स्थानिक आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी घाटबोरी/को गावात पोहोचून जिवीत वाहिनीच्या स्पर्शाने मृत्युमुखी पडलेल्या लंजे दाम्पत्य यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. २० सप्टेंबर रोजी निंदण करण्यासाठी शेतात गेलेले तुळशीदास रेवाराम लंजे, माया तुळशीदास लंजे यांना जिवीत वाहिनीच्या स्पर्शाने यांचा मृत्यू झाला होता.
तसेच इंदू हिरालाल लंजे या जखमी झालेल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच आमदारांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ही दुःखद घटना असल्याचे आमदार म्हणाले. या घटनेचे आम्हाला अतीव दुःख झाले आहे. शासकीय नियमानुसार मृतांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत केली जाईल.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश चुरे, सरपंच भूमिका बाळबुद्धे, उपकार्यकारी अभियंता नायडू, भुमेश्वर लंजे, व ग्रामस्थ उपस्थित होते.