घाटबोरी/को. येथील लंजे कुटुंबीयांची खासदार सुनील मेंढे व माजी मंत्री राजकुमार बडोले यांची सांत्वणा भेट
सडक अर्जुनी, दी. २६ सप्टेंबर : 20 सप्टेंबर 2023 रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी कोहळी येथील तुळसीदास लंजे व माया लंजे यांचा विज वाहिनीच्या स्पर्शाने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे दुखाचा डोंगर दाम्पत्यांचा कुटुंबावर कोसळला. कुटुंबाला सांत्वना भेट म्हणून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनिल मेंढे यांच्यासह राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी भेट दिली. दरम्यान माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी कुटुंबियाशी संवाद साधुन त्याचे सांत्वना देत धीर दिला आणि घटनेत जखमी झालेले इंदु हिरालाल लंजे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
मृतकाच्या परीजनांना सांत्वना देत माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. अचानक झालेल्या अपघातात लंजे कुटुंबातील दाम्पत्य मृत्युमुखी पडल्याने त्यांच्यावर दुखाचा डोंगर पडला असून त्यांना शासनाकडून आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करणार अशीही हमी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये,जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी,निशा तोडासे,माजी उपसभापती राजेश कठाणे, गौरेश बावणकर, प स सदस्य चेतन वडगाये,वर्षा शहारे,देवानंद वंजारी,प्रल्हाद वरठे,प्रतिभा भेंडारकर,तेजराम खोब्रागडे आदी उपस्थित होते.