Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

हरीश बन्सोड यांनी घेतली कोल्हे कुटुंबीयांची सांत्वना भेट

सडक अर्जुनी: तालुक्यातील ग्राम कनेरी येथील शेतकरी रमेश कोल्हे वय वर्ष ५७ या शेतकऱ्याने गाव शिवारात झाडाला गळफास लागून आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर घरचा कर्ता पुरूष गेल्याने उपासमारीची पाळी आली या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना हरीष बन्सोड यांनी आर्थिक मदत करून मानवतेचा संदेश दिला आहे.

यांच्या सोबत यावेळी कनेरी येथील सरपंच ज्योती प्रकाश पाउलझगडे, उपसरपंच विशाल वाघाये, भरत मेंढे, विणू भेंडारकर, दिनेश मोहतुरे, सुधीर शिवणकर आदी गावकरी उपस्थित होते या वेळी हरीष बंसोड यांनी शासनाची मदत मिळवून देण्यास मदत करू असे आश्वासन दिले. बनसोड हे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. तर तालुक्यातील एक युवा उद्योजक आहेत. तसेच तालुका काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती सेल चे ते अध्यक्ष आहेत.

error: Content is protected !!