16 व 17 ऑक्टोंबरला कोसमतोंडी येथे दांडिया स्पर्धा व सत्कार सोहळ्याचे आयोजन
सडक अर्जुनी – सडक अर्जुनी तालुक्यातील कोसम तोंडी येथे नवरात्रीच्या सुभ पर्वावर युवा दांडिया उत्सव समितीद्वारा 16 व 17 ऑक्टोबर रोजी स्पर्धा व सत्कार सोहळा शारदा मंडल बाजार चौक कोसम तोंडी येथे आयोजित करण्यात आले.
दांडिया स्पर्धा चे प्रथम बक्षीस 21000, तृतीय बक्षीस 15000 हजार तर तृतीय बक्षिक 11000 हजार रु. ठेवण्यात आले आहे.
दांडिया स्पर्धेतील उत्कृष्ट स्पर्धकांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येतील. त्याचप्रमाणे तालुक्यातील डिजिटल मीडिया आणि प्रिंट मीडिया चे मुख्य संपादक आणि पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते ,लोक कलावंत, बचत गटाचे महिला यांच्या सत्कार करण्यात येणार आहे.
16 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजे दांडिया स्पर्धाचे उद्घाटन खासदार सुनील मेंढे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र यांच्या अध्यक्षतेत पार पडेल तसेच उद्घाटक माजी. सामाजिक न्याय मंत्री इंजि. राजकुमार बडोले, माजी .मंत्री. डॉ. परीनये फुके सह उद्घाटक, माजी.आमदार संजय पुराम दीप प्रज्वलन, भंडारा गोंदिया जिल्हा समन्वयक वीरेंद्र अंजनकर, भाजपा जिल्हाध्यक्ष एडवोकेट उपराडे ,संजय टेंभरे सभापती जिल्हा परिषद बांधकाम गोंदिया, भाजप युवा अध्यक्ष विनोद कुमार मोदी, लक्ष्मीकांत धानगाये तालुका अध्यक्ष भाजप , छायाताई चव्हाण ,पंचायत समिती सभापती संगीता खोब्रागडे, पंचायत समिती सदस्य निशा काशीवार आणि.इतर मान्यवरांचे हस्ते करण्यात येईल.
स्पर्धेचे बक्षीस वितरक कृउबास सभापती डॉक्टर अविनाश काशिवार, सरपंच महेंद्र पसीने, विलास काशीवार, दिलीप काशीवार ,नंदकुमार चव्हाण, लता काळसर्पे, गजानन काशीवार उपसरपंच ,अश्विनी काशिवार ,बळीराम मुंगमोळे, कुंदा मडकाम ,शकुंतला काशीवार व अन्य मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात येईल या दांडिया स्पर्धेची प्रवेश फी 500 रुपये असून स्पर्धकांनी जास्त संख्येने सहभाग घ्यावे असे आयोजक गौरेश बावनकर व युवा दांडिया उत्सव समिती कोसंम तोंडी च्या वतीने करण्यात आले आहे.