डॉ.सुशिल लाडे यांचा दांडिया उत्सव समिती द्वारे खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते सत्कार
सडक अर्जुनी – कोसमतोंडी येथे युवा दांडिया उत्सव समितीच्या वतीने दांडिया स्पर्धेचे दोन दिवसीय आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पत्रकार,लोककलावंत, आणि सामाजिक कार्ये करणाऱ्या व्यक्तींचे सत्कार कार्यक्रम दिनांक 16 ऑक्टोंबर रोज सोमवरला करण्यात आले.
यावेळी साप्ताहिक समाचार पत्र महाराष्ट्र का मानबिंदू (प्रिंट मीडिया) आणि MKM NEWS 24 (डिजिटल मीडिया) चे प्रधान संपादक डॉ. सुशिल लाडे यांचा सत्कार भंडारा /गोंदिया चे खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ ,प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देहून सत्कार करण्यात आले आणि विशेष म्हणजे शिक्षा पे चर्चा कार्यक्रमात पालक वर्ग म्हणून भाग घेतल्यामुळे प्रधान मंत्री मा.नरेंद्र मोदी यांच्या PMO प्रधान मंत्री कार्यालयातून डॉ.सुशील लाडे यांना स्पीड पोस्ट द्वारे आलेले पत्र सुद्धा खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष भाजप लक्ष्मीकांत धांनगाये, पंचायत समिती सभापती संगीता खोब्रागडे, उप सभापती शालिंदर कापगते, प. स.सदस्य चेतन वळगाये, निशा काशिवार, छाया ताई चौहान, शिला ताई चौहान, सौंदड चे सरपंच हर्ष मोदी, संदीप मोदी, कार्यप्रमुख गौरेश बावनकर आणि अन्य पदाधिकारी , गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.