Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

आज 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस, बाबासाहेबांचा शाळेच्या पहिल्या वर्गात प्रवेश दिवस

सडक अर्जुनी – तेलाचे दिवे तर आपण लावतोच परंतु

ज्ञानाचे दिवे लावल्याशिवाय शोषित पीडित समाजाचे अंधकारमय जीवन प्रकाशमान होणार नाही!!

आज ७ नोव्हेंबर विद्यार्थी दिवस

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, आधुनिक बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर यांचा ७ नोव्हेंबर १९०० रोजी जिल्हा सातारा राजवाडा सातारा हायस्कूल (सध्याचे छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल जिल्हा सातारा) मध्ये इयत्ता पहिली या वर्गात प्रवेश झाला. हजेरी पुस्तकावर भिवा असे त्यांचे नाव होते. हा ऐतिहासिक ठेवा आज ही या प्रताप हायस्कूल शाळेने जपून ठेवला आहे.

२०१४ ते २०१९ पर्यंत माजी. मंत्री राजकुमार बडोले हे राज्याच्या सामाजिक न्याय मंत्री तसेच श्री विनोद जी तावडे राज्याचे शिक्षण मंत्री म्हणून जवाबदारी होती. ७ नोव्हे. विद्यार्थी दिवस साजरा करण्याची घोषणा  स्वतः सातारा येथील प्रतापसिंह शाळेत जाऊन त्यांनी केली होती.

तेव्हापासून बाबासाहेबांचा शाळेचा पहिला दिवस म्हणून महाराष्ट्र शासन वर्ष २०१७ पासून ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करीत आहे.

error: Content is protected !!