Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) चे आ. चंद्रिकापुरे यांना निवेदन

सडक अर्जुनी – MKM NEWS 24- महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक व कृती समिती द्वारे विविध मागण्या ंना घेऊन 4 डिसेंबर 2023 पासून संपूर्ण महाराष्ट्रात सह गोंदिया जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी राज्यवती बेमुदत संपावर जाणार असून यांच्या विविध मागण्या मान्य करण्याचे अनुषंगाने सडक अर्जुनी तालुक्यातील अंगणवाडी बालवाडी सेविका यांनी आज अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना निवेदन दिले.

जिल्ह्यातील अंगणवाडी बालवाडी, सेविका, कर्मचारी पदे ही वैधानिक पदे कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारी वेतनश्रेणी भविष्य निर्वाह निधी आधी सुरक्षा इत्यादी सगळे लाभ देण्यात यावे अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांना किमान 26 हजार रुपये तर मदतनीस यांना वीस हजार रुपये मानधन वाढ करण्यात यावी यास इतर मागण्यांना घेऊन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना संघटनेचे राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

error: Content is protected !!