Monday, May 12, 2025
भंडारालाखांदुर

नॅचरल ग्रोवर्स साखर कारखाना गाळप हंगामाचे खासदार प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते शुभारंभ

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी साखर कारखाना ठरणार वरदान – प्रफुल पटेल

नॅचरल ग्रोवर्स साखर कारखाना गाळप हंगामाचे खासदार प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते शुभारंभ

शुभारंभ प्रसंगी खा. श्री प्रफुल पटेल म्हणाले की, परिस्थितीनुरूप हा कारखाना बंद पडला होता पण या वैनगंगा व चुलबंद नदीच्या खोऱ्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी व लोकोपयोगी कामांसाठी पुन्हा साखर कारखाना सुरु करण्यात आला आहे. निश्चितच लाखांदूर, पवनी, अर्जुनी मोर, साकोली, लाखनी, सडक अर्जुनी, देसाईगंज व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी वरदान ठरणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना अन्य पिकांच्या उत्पादनाचा पर्याय मिळावा व शेतीवर आधारित अन्य उदयोग यावेत याच उद्देशाने कारखाना सुरु करण्यास प्रयत्न असे प्रतिपादन श्री पटेल यांनी केले.

आज लाखांदूर जि. भंडारा येथील नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याच्या पहिले गाळप हंगामाचे शुभारंभ, गव्हाण व मोळी पूजन कार्यक्रम खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

खा.श्री पटेल पुढे म्हणाले की, कामांसाठी कोणतीही बोंबाबोंब न करता विकास कार्य करण्यावर विश्वास ठेवतो. शेतकरी व शेतमजुर व बेरोजगारांचे हितासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत. सध्या साखर कारखान्याची क्षमता ८०० मेट्रिक टन असून पुढे कारखान्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. या कारखान्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असून प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष पणे शेतमजूर व बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आहे.

या शुभारंभ प्रसंगी खा.श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री मनोहर चंद्रिकापुरे, श्री नानाभाऊ पंचबुद्धे, श्री गंगाधर परशुरामकर, श्री बाबा गुजर, श्री सुनील फुंडे, श्री धनंजय दलाल, श्री यशवंत गणवीर, श्री विनोद ठाकरे, श्री अविनाश ब्राह्मणकर, श्री संजय गुजर, श्री सत्यजित गुजर, श्री विजय सावरबांधे, श्री बालूभाऊ चुन्ने, श्री लोकपाल गहाने, संजना वरखडे, निमाताई ठाकरे, कल्पना जाधव, डॉ अविनाश काशीवार, श्री लोमेश वैद्य, श्री हरीश तलमले, अड मोहन राऊत, श्री धनु व्यास, श्री नागेश पाटील, श्री देविदास राऊत, श्री दानेश साखरे, श्री नरेंद्र चौधरी, श्री बबन पिलारे, श्री राकेश राऊत, श्री उमेश राऊत, श्री सचिन बरंय सहित मोठ्या संख्येने शेतकरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!