Monday, May 12, 2025
दिल्ली

जिल्हा परिषद मोरगाव शाळेत वार्षिक स्नेहसम्मेलन उत्साहात संपन्न

अर्जुनी मोरगाव – MKM NEWS 24- जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन, त्यांच्या सुप्त क्षमता विकसित करण्यासाठी तीन दिवसीय स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांची सृजनात्मक शक्ति विकसित व्हावी या हेतूने सदैव उपक्रमशील शाळा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव ने अतिशय विलोभनीय प्रेक्षणीय कवायत लेझिम, डंबेल्स ,आदिवासी नृत्य, लोकनृत्य, एकपात्री प्रयोग, लघुनाट्य, एकांकिका, विविध मैदानी खेळ व महिलांकरिता हळदी -कुंकू सारखे पंचरंगी कार्यक्रमाचे सादरीकरण करून, उपस्थितांचे लक्ष वेधले व वाहवा मिळविली.
सदर, वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य कविताताई कापगते यांनी केले तर प्रमुख उपस्थिती म्हणून अर्जुनी/मोर चे सभापती सविता कोडापे,सरपंच गीताताई नेवारे, उपसभापती होमराज पुस्तोडे ,झाडीपट्टीच्या बहिणाबाई अंजनाताई खुणे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुनेश्वर शहारे, शिवराम पाटील लोदी, डॉ. सुशील लाडे , पोलीस पाटील रमेश झोडे , तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश लाडे व ग्रामस्थ , आदी मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन अँल्यूमनी अससोसिएशन्स आय.आय.टी. दिल्ली चे डायरेक्टर कल्पेन शुक्ला व त्यांची पत्नी वीरा शुक्ला, अँल्यूमनी अससोसिएशन्स आय.आय.टी. दिल्लीचे सेक्रेटरी पंकज कपाडिया, कार्यकारी सदस्य पूनम लाडे,शिक्षण प्रेमी तथा प्रतिष्ठित नागरिक पंढरी लाडे आदी मान्यवर उपस्थित होते .याप्रसंगी अँल्यूमनी अससोसिएशन्स आय.आय.टी. दिल्लीने शाळेला डिजिटल बोर्ड व आर.ओ. प्लॅन्ट एकूण किंमत रु.दोन लक्ष तीस हजार किंमतीच्या साहित्याचे लोकार्पण केले. उद्घाटनिय भाषण देतांना अँल्यूमनी अससोसिएशन्स आय.आय.टी. दिल्लीचे डायरेक्टर कल्पेन शुक्ला म्हणाले की, आदिवासी, दुर्गम भागातील शाळेतील नियोजनपूर्ण व शिस्तबद्ध कार्यक्रमाचे आयोजन तसेच शहरी झगमगटाला लाजवेल अशी रोषणाई पाहून खरंच आम्ही मंत्रमुग्ध झालोत.आमचे संपूर्ण जीवन दिल्ली सारख्या शहरात जात आहे परंतु ग्रामिण भागांतील विद्यार्थी, शिक्षकानी भारतीय कला व संस्कृती च्या दर्शनाने भारावून गेलो असल्याचे मनोगत व्यक्त केले तर अँल्यूमनी अससोसिएशन्स आय.आय.टी. दिल्ली चे सेक्रेटरी पंकज कपाडिया यांनी डिजिटल बोर्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे सुलभ होईल व आर. ओ. प्लॅन्टमुळे विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकेल.आमच्या अससोसिएशन्स मार्फत दिली जाणारी मदत म्हणजे ही एक छोटीसी सामाजिक दायित्वाची भूमिका असून , माझे सहकारी व उत्तम प्रशासक पूनम लाडे यांच्या उत्तम कार्याची पावती असल्याचे मत व्यक्त केले.
स्नेह संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे हस्ते झाले.जिल्हा परिषद शाळा अलीकडे कात टाकत आहेत मोरगावच्या शाळेचे इतरांनी अनुकरण करून, शिक्षण विकासाची कास धरावी असे आवाहन केले तर माजी सामाजिक व न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी अध्यक्षीय भाषनातून शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता,शाळेची वाढती पटसंख्या व विविध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे या देशाची सुजाण व सक्षम पीढी घडविण्यास मदत होऊ शकेल असा आशावाद व्यक्त करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात.
याप्रसंगी जिल्हा परिषद गोंदिया चे गटनेता लायकराम भेंडारकर,अनिल दहिवले, सी. आय. डी .इन्स्पेक्टर योगेश लाडे, माणिक नंदनवार,प्रधान गुरुजी,गोवर्धन लंजे, मोहन नाईक, खुशाल कोडापे,गंगुबाई मेमोरियल ट्रस्ट चे अध्यक्ष प्रशांत शहारे गतसमनव्ययक सत्यवान शहारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रेखा गोंडाने व सु.मो.भैसारे यांनी केले तर सूत्रसंचालन पुरुषोत्तम गहाणे, उपस्थितांचे आभार जितेंद्र ठवकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी- तेसाठी विलास भैसारे,वामन घरतकर, अचला कापगते, सोनूताई कऱ्हाडे,प्रगती लाडे, तानाजी लोदी, विद्यार्थी प्रतिनिधी लीना नवरंग, अथर्व कऱ्हाडे आदिंनी केले.

error: Content is protected !!