अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राच्या समस्या मार्गी लावा, माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे आदिवासी मंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन
सडक अर्जुनी –अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात अनेक समस्या अद्यापही मार्गी लागलल्या नाहीत. त्यातच गडचिरोली जिल्ह्यातील आंबेतलाव ते अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गौरनगर हे सर्वाधिक लांब आदिवासी
नक्षलप्रभावित क्षेत्र असून येथील गावकऱ्यांना मुलभूत सुविधांपासून सुद्धा वंचित रहावे लागत आहे.
तेव्हा अर्जुनी मरोगाव तालुक्यातील. समस्या सोडविण्यासाठी माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांनी
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची भेट घेवून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या समस्या सोडविण्याची मागणी केली.
तसेच या संदर्भात निवेदन सादर केला.अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्र आदिवासी बहुल अतीदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जातो. या अतीदुर्गम भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भगवान बिरसा मुंडा योजना व ठक्कर बाप्पा विकास योजनेंतर्गत विकास कामासाठी निधी मंजूर करण्यात यावे, वनहक्क जमीनीचे पट्टे लवकरात लवकर देण्यात यावे,अर्जुनी मोर. विधानसभातील शेंडा ऊसिखेडा, झाशिनगर, तिडका,येरंडी, दोडके, अशा अनेक दुर्गम
भागात मोबाईल रेंज मिळत नसल्याने संबधित यंत्रणांची बैठक घेवुन मोबाईल रेंज वाडविण्यासंदर्भात त्वरीत कार्यवाही करावी. अशा विविध मागण्यांचे निवेदन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राज्याचे आदिवासी
विकास मंत्री विजयकुमार गावित यांना प्रत्यक्षात भेटुन विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांचे निवेदन यावर त्वरीत तोडगा काढण्याची विनंती केली. तसेच
विविध विषयांवर चर्चा केली.