जिल्हा परिषद मोरगाव शाळेचा वरद प्रधान लांब उडीत अव्वल
मोरगाव अर्जुनी – MKM NEWS 23 –जिल्हास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२३ मध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्याच्या विविध शारीरिक क्षमता व सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध सांघिक व वैयक्तिक स्पर्धा घेण्यात येत आहेत त्यात जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव चा वरद नरेश प्रधान याने लांब उडीत अव्वल स्थान मिळवून , मोरगाव च्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला.
वरद हा विद्यार्थी अर्जुनी/मोर चा निवासी असून, त्याचे वडील नरेश प्रधान पदवीधर शिक्षक आहेत तर आई ग्रामपंचायत दाभना च्या सरपंच आहेत. वरद हा अभ्यासाबरोबरच विविध क्षेत्रात एक अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा विद्यार्थी असून, त्याच्या पालकांनी त्याच्या क्षमतेचा सर्वांगाने विकास साधावा ह्यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव येथे प्रवेश घेतला .मोरगाव शाळेत त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांमुळे पालक आनंदित आहेत. मुख्यध्यापिक रेखा गोंडाने, सु.मो भैसारे, पुरुषोत्तम गहाणे, जे.टी. ठवकर,विलास भैसारे, वामन घरतकर,अचला कापगते, सोनूताई कऱ्हाडे, प्रगती लाडे आदींनी अभिनंदन केले.