शेकडो कार्यकर्त्यांसह डाॅ. भारत लाडे यांचा काॅग्रेस पक्षात प्रवेश
अर्जुनी मोर.( सुरेंद्रकुमार ठवरे )- अर्जुनी मोर. तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक प्राप्त तथा वैद्यकीय सेवेसोबतच विविध लोकोपयोगी उपक्रम तथा वेगवेगळी आरोग्य शीबीर राबवुन हजारो रुग्णांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळवुन देणारे युवा सामाजिक कार्यकर्ते डाॅ. भारत लाडे यांनी ता.21 डिसेंबर रोजी साकोली येथे काॅग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवुन शेकडो कार्यकर्त्यांसह काॅग्रेस मधे प्रवेश केला आहे.
अर्जुनी मोर. तालुक्यातील डाॅ. भारत लाडे आणी विविध पक्षात कार्यरत असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काॅग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार व काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सर्वांचे दुपट्टा व पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले तथा पक्ष बळकटी साठी प्रयत्न करा असे आवाहन केले. डाॅ. भारत लाडे यांचे नेतृत्वात कैलास चांदेवार, वामण येरणे, नरेंद्र बेलखोडे, प्रफुल वालदे, प्रदिप क-हाडे, सुशिल कांबळे, सुरेंद्र वाघमारे, माधवराव चांदेवार, मार्क॔ड मिश्रा, रत्नदिप कांबळे, लक्ष्मण बावनकुळे, विनायक चुलपार,अनिल घरतकर,दशरथ पर्वते,झिंगर खोब्रागडे, कैलास चाचेरे, राकेश चाचेरे, रितेश मिश्रा, नेमिचंद मिश्रा, रामकृष्ण चर्जे, कृष्णा कांबळे, दुष्यांत पातोळे,किशोर शहारे, या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडोच्या संख्येनी काॅग्रेस मधे प्रवेश घेतला. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, गोंदिया जिल्हा काॅग्रेस कमेटी अध्यक्ष दिलीप बन्सोड, तालुका अध्यक्ष घनश्याम धामट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, शिला उईके, चंद्रकला ठवरे, प्रमोद पाऊलझगडे, अनिल दहीवले, केतन मेश्राम, विजयसिंह राठोड, सर्व्हेश भुतडा, संजय जायस्वाल, आदी नेते उपस्थित होते. काॅग्रेस मधे प्रवेश घेणा-या शेकडो कार्यकर्त्यांनी पुढे होवु घातलेल्या सर्वच निवडणुंकात काॅग्रेस चे उमेदवार निवडुन आणण्यासाठी संपुर्ण ताकतीनिशी प्रयत्न करु असे ठणकावून सांगितले.