महाराष्ट्र आफिसर्स फोरम च्या अध्यक्षपदी आमदार मनोहर चंद्रिकापुरे
गोंदिया/सडक अर्जुनी – महाराष्ट्र आफिसर्स फोरम ची वार्षिक सर्वसाधारण आमसभा नुकतीच डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह,बानाई, येथे पार पडली.या सभेचे पिठासीन अध्यक्ष सुधीर शंभरकर होते.त्यांनीच राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या निवडणूकीची प्रक्रिया, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पार पाडली.
विषयसूचीतील पाच विषय आणि अध्यक्ष यांच्या परवानगीने पाच विषय अश्या एकूण दहा विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि एकमताने ठराव पारित करण्यात आले.विषय क्रमांक एक नुसार २९मे२०२२ रोजी गठीत राज्यस्तरीय कार्यकारिणी पूर्णतः निरस्त, बरखास्त करण्यात आली.
नवीन राज्यस्तरीय कार्यकारिणी एक मताने गठीत करण्यात आली.त्यातअर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे आमदारआमदार मनोहर चंद्रिकापूरे यांची अध्यक्ष पदी तर इंजी.सच्चिदानंद दारूंडे यांची सचिव पदी निवड करण्यात आली.उपाध्यक्ष- डॉ पंजाबराव मूल, अनिल फुलझेले, सहसचिव – डॉ.विध्या मानकर , कोषाध्यक्ष – दिगांबर गोंडाने , कार्यकारिणी सदस्य – मिलिंद बनसोड, डॉ प्रशांत गेडाम, किशोर सुरडकर , केतन सोनपिपरे यांची निवड करण्यात आली.
सभेला मोठ्या संख्येने फोरमचे सदस्य उपस्थित होते. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी त्यांच्या अभिनंदन केले आहे.