बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करा, नागरिकांची मागणी
(लहान मुले या मांजामुळे जखमी होतात. त्यामुळे हा मांजा विक्रीस बंदी आहे. मांजाचा धोका वाढत विक्रीवर 1973 च्या कलम 144 नुसार विक्री व साठवणूक करण्यावर बंदी, (पर्यावरण (संरक्षक) अधिनियम, १९८६ चे कलम ५ अन्वये) बंदी आहे.तरी सडक अर्जुनी शहरात आणि तालुक्यात जीवघेणा मांज्याची विक्री होत असल्याची चर्चा जन सामान्य नागरिकांत आहे.)
सडक अर्जुनी – ( डॉ.सुशील लाडे) – पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉनचा, मांजा नागरिकांच्या जिवावर बेतत असल्याच्या अनेक घटना घडतात. नुकताच मुंबई मध्ये दि.25 डिसेंबर ला एका पोलिसाचा गळा चिरून मृत्यू झाला. तर जवळील साकोली येथे एका मुलाची जीभ 70 टक्के कापल्या गेली. या मांजा मुळे पक्ष्यांसह माणसेही जखमी होतात.अनेक लहान मुले या मांजामुळे जास्त प्रमाणात जखमी होतात. त्यामुळे हा नॉयलॉन मांजा शासनाने विक्रीस बंदी घातली आहे. मांजाचा धोका वाढत विक्रीवर 1973 च्या कलम 144 नुसार विक्री व साठवणूक करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.


पुर्वी संक्रातीच्या दरम्यान पंतग उडवली जाण्याची प्रथा होती. या दरम्यान पंतग उत्सव साजरा केला जात आहे. मात्र अलिकडे वर्षभर पंतग उडवले जातात. पतंग उडवण्याला विघातक स्वरुप प्राप्त होताना दिसतय. पतंग उडविताना प्रतिस्पध्र्याची पतंग कापण्यासाठी वेगवेगळे शर्तीचे प्रयत्न केले जावू लागलेत. मांजा काटाकाटी करताना इतरांपेक्षा सरस कसा राहील, यासाठी लागलेली चढाओढ इतरांच्या जीवावर बेतणारी ठरत आहे.
नायलॉन मांजा विक्रीस बंदी असली तरी गोंदिया जिल्ह्यात विविध तालुक्यात आणि शहरात मोठ्या प्रमाणात या घातक मांजाचा साठा असल्याचं बोलल जात आहे. अनेक व्यापारी हा मांजा छुप्या पद्धतीनं चढ्या भावान विक्री करतात. संक्रांतीला पंतग उडवण्याच्या प्रथा-परंपरेला सध्या हरताल दिली जात आहे. वर्षभर सुटी असताना पतंग आकाशात दिसून येतात. यात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाच्या वापर होताना दिसत आहे.
काही प्रमाणात मांजा चिनी असून त्याच्यावर सरकारने बंदी घातली आहे. मात्र, अजूनही बाजारपेठेत हा मांजा ग्राहकांना सहजपणे उपलब्ध होत आहे. पतंग काटण्यासाठी स्पर्धकांकडून या दोऱ्याचा सर्रास वापर केला जात आहे. केंद्र सरकार आणि राष्ट्रीय हरित न्यायालयाने नायलॉन, चिनी मांजावर बंदी घातली आहे. तरीही शहरात पोलिसांनी कारवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्था नगर पंचायत ने सुद्धा अशा जीवघेण्या मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई केली पाहिजे.
“शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजा हा मनुष्य, प्राणी, पर्यावरणाला धोका आहे. नायलॉन मांजा मुळे खूप अनुचित घटना घडल्या आहेत. समोर तीळसंक्रात आहे पतंग उडविण्यासाठी कोणीही बंदी असणाऱ्या नायलॉन मांजा विक्री करत असल्याचे आढळल्यास नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येहील”
तेजराम मडावी नगराध्यक्ष नगरपंचायत सडक अर्जुनी