विद्यार्थ्यांनी अभ्यास करून यशस्वी व्हावे : उपविभागीय अधिकारी शहारे

सडक अर्जुनी : आजचे स्पर्धेचे युग आहे. विद्यार्थ्यांनी ध्येय
निश्चित करून मेहनत घ्यावी. यशस्वी होण्यासाठी चिकाटी एकाग्रता, कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. खूप मोठी स्वप्ने पाहावीत आणि खूप अभ्यास करून जीवनात यशस्वी व्हावे. असे प्रतिपादन अर्जुनी मोरगावचे उपविभागीय
अधिकारी वरुणकुमार शहारे यांनी केले. राका येथील नवजीवन विद्यालयात नुकताच वार्षिक स्नेहसंमेल कार्यक्रम
घेण्यात आला. यावेळी आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपविभागीय
अधिकारी वरुणकुमार शहारे यांचे हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हस्ते गौरविण्यात आले. तसेच एनएमएमएस परीक्षेत जिल्ह्यातून दुसरी आलेली ज्ञानेश्वरी खोजराम धनभाते व जान्हवी विश्वनाथ लंजे यांचासुद्धा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे संविधान गुणगौरव परीक्षेत शाळेतून पहिला क्रमांक पटकाविणारी चैतन्या कोरे हिला जिल्हा समन्वयक संविधान गुणगौरव परीक्षेचे अनिल मेश्राम यांच्या सौजन्याने उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांच्या हस्ते भारताचे संविधान, पुष्पगुच्छ व पेन देऊन गौरविण्यात आले. संचालन एस. एस. मेंढे केले. आभार एस. जे. चांदेवार याना मानले.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे, प्रा. डॉ. रमेशचंद्र अग्रवाल, दामोदर नेवारे,
डॉ. सुशिल लाडे, रोशन बडोले, दिनेश हुकरे, संस्थेचे अध्यक्ष यशवंत दुनेदार, सचिव मधुसूदन दोनोडे, सहसचिव
संतोष पातोडे, सिद्धार्थ रामटेके, विकास कोरे, रमेश दोनोडे, भास्कर उपरीकर, पोलिस पाटील मुन्नालाल पंचभाई,
मुख्याध्यापिका पी. एम. चुटे उपस्थित
होते. दरम्यान, इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.