संतांच्या विचारानेच समाज परिवर्तन:- दानेश साखरे
अर्जुनी मोर. :- सुरेंद्रकुमार ठवरे- संपुर्ण भारतात महाराष्ट्राची संस्कृती इतरांनी प्रेरणा घेण्यासारखी आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र तयार होण्यात साधुसंतांची भुमिका व त्यांचे सर्वसमावेशक विचार महत्वपूर्ण ठरले आहे.संत जगनाडे महाराजांनी संत तुकाराम महाराजांना गुरु मानुन तुकारामांचे अभंग पुर्नेजिवीत केले.
संत जगनाडे महाराज केवळ तेली समाजाचेच नव्हे तर अख्खा महाराष्ट्रातील प्रत्येक समाज बांधवांना प्रेरणास्रोत आहेत.सर्व समाजबांधवानी अंगीकारावे असे विचार संत जगनाडे महाराज यांनी दिले आहेत. शेतीच्या कामात व्यस्त असलेल्या तेली समाज बांधवांनी आपली शैक्षणिक प्रगती साधून उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगावे असे आवाहन अर्जुनी मोर. चे नगरसेवक तथा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष दानेशभाऊ साखरे यांनी केले आहे.
तालुक्यातील बाराभाटी येथे आयोजीत संत शिरोमणी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजीत समाजप्रबोधन कार्यक्रमात दानेश साखरे बोलत होते.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाजीराव तुळशीकर,उद्योगपती नितीन पुगलिया, जिल्हा परिषद सदस्या कविता अशोक कापगते, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, बाजार समिती उपसभापती अनिल दहीवले, युवा सामाजिक कार्यकर्ते दिलवरभाई रामटेके, बाराभाटी च्या सरपंच सरस्वता चाकोटे, गिताबाई कापगते, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तेली समाज संघटनेचे सर्व कार्यकर्ते, व समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
पुण्यतिथी समारोहाला तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.