Monday, May 12, 2025
गोंदियादेवरी

कलकसा दुर्गम भागात सामाजिक वसा जोपासून शिक्षक समितीने घडविले मानवतेचे दर्शन

कलकसा दुर्गम भागात सामाजिक वसा जोपासून शिक्षक समितीने घडविले मानवतेचे दर्शन

• रक्तदानासह गरीब व गरजू विद्यार्थी व ग्रामस्थांना साहित्य वाटप

देवरी/ गोंदिया – नेहमीच सामाजिक कार्यासाठी तत्पर असलेली जिल्ह्यातील एकमेव संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती’ ज्या समितीचे ब्रीदच असे आहे, ‘न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड’ या ध्येयाला समोर ठेवूनच ‘दर्शन मानवतेचा- वसा सामाजिक बांधिलकीचा’ याअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त,आणि 100% आदिवासी बहुल भागात मिसपीरी ग्रामपंचायत अंतर्गत कलकसा या गावांमध्ये समाजासाठी झटलेला, समाजाचे विकास घडवून आणण्याचे स्वप्न बघणारा आणि समाजासाठी झटता-झटता काळाने घात घातलेल्या तरुण शिक्षक स्व. रमेश ताराम यांच्या स्मृतिपित्यर्थ घेण्यात आला.

शिक्षक समितीने उपक्रमाअंतर्गत भव्य असं *रक्तदानाचा* कार्यक्रम आयोजित केला, त्यामध्ये जवळपास 35 ते 38 शिक्षकांनी रक्तदान केलं.महात्मा गांधीजींच्या विचाराप्रमाणे ‘स्वच्छता ही सेवा’ हे ब्रीद समोर ठेवून संपूर्ण कलकसा या गावात ग्रामसफाई करण्यात आली.गावातील प्रत्येक घर, घराच्या वेशीवर तोरण, दारावर तोरण, फुलांची माळ आणि अंगणात काढलेली सुबक अशी रांगोळी स्व. रमेश ताराम यांच्या आठवणीना उजाळा आपसूचकच दिसून येत होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. गोंदियाचे मुख्य लेखा वित्त अधिकारी जनार्दन खोटरे साहेब, प्रमुख अतिथी म्हणून सविताताई पुराम महिला व बालकल्याण सभापती, अंबिकाताई बंजार सभापती पंचायत समिती , सरपंच उसेंडी मॅडम, पंचायत समिती सदस्य रणजीत कासाम ,मोतीराम ताराम ,श्रीमती सुनंदा ताराम , प्रसिद्ध उद्धोगपती विजय येडे होते.
प्रास्ताविकातून जिल्हाध्यक्ष संदीप तिडके सर यांनी स्व. रमेश ताराम यांच्या त्या पंचक्रोशीत असलेलं कार्य, गावाप्रती-आदिवासी बांधवांप्रती असणारी तळमळ आणि त्याच तळमळीला समोर घेऊन जाऊन त्यांच्यासारखे नवीन रमेश ताराम तयार करण्याचे विचार समोर ठेवले.प्रास्ताविकातील शब्द न् शब्द ऐकताच तेथे केविलवाण्या नजरेने स्वर्गीय सरांच्या प्रतिमेकडे बघत असलेल्या तेथील माता-बहिणी यांचे पदर तोंडावर आणि डोळे पाणावलेले होते. अध्यक्षस्थानावरून जनार्दन खोटरे यांनी “मी सुद्धा आदिवासी समाजातील आहे आणि समाजासाठी झिजने हे माझे परम कर्तव्य आहे” असे मत व्यक्त केले.समितीने सामाजिक बांधिलकीचा वसा पुढे नेत, कलकसा, येडमागोंदी आणि गुजुरबडगा या गावातील इयत्ता 1 ते 8 च्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू (भेटवस्तू, स्वेटर आणि जुते) वाटप करण्यात आले.गावातील सर्व कुटुंबांना ब्लॅंकेट ही भेटवस्तू वितरित करण्यात आल्यात.दिव्याप्रमाणे समितीची ज्योत जळत राहावी,कार्य उजळत रहावे आणि स्वर्गीय रमेश ताराम यांच्या स्मृतींना उजाळा मिळत राहावा हे व्रत समोर ठेवून समितीतर्फे आयोजित *दीपोत्सव* गावामध्ये साजरा करण्यात आला.जशी जशी सायंकाळ होत गेली,तसतशा आया-बहिणी समोर आल्या आणि आपल्या दारावर, वेशीवर पाच-पाच दिवे त्यांनी तेवत ठेवले.तिन्ही गावातील गावकरी आणि उपस्थित सर्व शिक्षक समितीचे कार्यकर्ते यांना स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन आर.एच. वाघाडे यांनी केले तर आभार जिल्हा कोषाध्यक्ष उत्तम टेंभरे यांनी केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार,महिला जिल्हाध्यक्ष ममता येडे, महिला सरचिटणीस प्रतिमा खोब्रागडे ,जिल्हा मार्गदर्शक डी.एच.चौधरी ,राज्य कार्यकारणी सदस्य शरद पटले , उपाध्यक्ष होमराज बीसेन ,कार्याध्यक्ष मुकेश रहांगडाले,कोषाध्यक्ष उत्तम टेंभरे ,मुख्य संघटक दिलीप नवखरे,अशोक बिसेन, विपेंद्र वालोदे, हटवार सर,दिलीप लोधी, कृष्णा कहालकर, सुनील हरीणखेडे,सतीश दमाहे ,राजेंद्र बोपचे, सतिश दमाहे,जीवन म्हशाखेत्री, पी.टी.नेवारे,राधेश्याम ठाकरे,,गजानन पाटणकर,आशिष कापगते, चव्हान सर,अनिल वट्टी, आर.एच.वाघाळे, उमेश बागडे,सेवाकराम रहांगडाले, जयश लील्हारे ,मिथुन चव्हाण, तुषार कोवले, जोहनलाल मलगाम, महेश कवरे , विनोद बहेकर, तेजराम नंदेश्वर,नोकलाल शरनागत, मुरली चव्हान, शामराव येरणे, लोकेश नाकाडे,प्रकाश गावड, वीरेंद्र खोटेले, पी टी नेवॉरे , अरविंद कापगते, प्रवीण दमाहे, रेवाराम उके , रवि जाधव, सुनिल राठोड, अंकुश पवार, नरेंद्र अमृतकर, सुभाष नरट्टी, सुरेश सोरोटे, दिलिप उईके, लेखराज ठाकूर, देवानंद आचले, कु.मीनाक्षी पंधरे,गीता लांडेकर ,मंजुश्री लढी, प्रेमलता बघेले , शारदा अंबादे, वर्षा वालोदे,उषा कुरसुंगे, ललिता थुलकर यासह शिक्षक समिती पदाधिकारी उपस्थीत होते.

error: Content is protected !!