Sunday, May 18, 2025
सड़क अर्जुनी

नगराचा विकास हेच आपले धेय्य असले पाहिजे – आ. मनोहर चंद्रिकापुरे

सडक अर्जुनी – MKM NEWS 24- नगरातील नागरिकांना उत्तम सुविधा देण्याचे काम नगरपंचायतीचे असते. स्थानिक पातळीवरील नगरपंचायत ही नगर प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संस्था असून या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम नगरपंचायत च्या माध्यमातून होणे गरजेचे आहे. नगराचा विकास हेच आपले ध्येय असले पाहिजे असे विचार आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले. ते सडक अर्जुनी नगरपंचायत क्षेत्रातील विकास कामाचे शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. वैशिष्ट्ये पूर्ण योजना सन 2023 24 अंतर्गत विविध विकास कामाचे भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांचे हस्ते करण्यात आले.

नागरी सुविधा सहाय्य योजनेअंतर्गत विविध विकास कामासाठी 7 कोटी रुपये मंजूर करण्यात आले यात सिमेंट रस्ता बांधकाम गट्टू लावणे ,नाली बांधकाम सभा मंडप बांधकाम, चावडी बांधकाम, घेण्यात आले आहे.यावेळी नगराध्यक्ष तेजराम मडावी, उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, मुख्याधिकारी शरद हल्मारे, डॉ. सुगत चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अविनाश काशिवांर, तसेच नगरपंचायत चे सर्व पदाधिकारी ,सदस्य, नगरपंचायत चे  ठेकेदार आणि नगरवाशी उपस्थित होते.

error: Content is protected !!