मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी दिली गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेला भेट
गोंदिया – mkm news 24- जिल्ह्यातील गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित गोंदिया र. न. ०१ ही नावाजलेली अग्रणी पतसंस्था म्हनून जिल्हयात नावलौकिकास आहे. पतसंस्थेला संचालक मंडळाच्या विनंती वरून गोंदिया चे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील (भा प्र.से) यांनी भेट देऊन पतसंस्थेविषयी माहिती जाणून घेवून संचालक मंडळ सोबत चर्चा केली. यावेळी संचालक मंडळाच्या वतीने श्री अनिल पाटील IAS यांचा शाल सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
संस्थेची वार्षिक उलाढाल ही 400 कोटीच्या वर असून संस्थेचे सभासद फक्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक आहेत , संस्थेच्या ठेवी व कर्ज वाटप हे 300 कोटी च्या घरात आहे, सभासद कर्ज मर्यादा ही 25 लक्ष आहे , अशी संस्थेबद्दल माहिती संस्थेचे अध्यक्ष किशोर डोंगरवार यांनी संचालक मंडळाच्या वतीने दिली*
*मागील अनेक दिवसापासून एन पी ए चे प्रमाण वाढत असल्यामुळे संस्थेने मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था गोंदिया यांच्या नावाने करारनामा करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद गोंदिया ला सादर केला आणि त्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंजूर करून सर्व गटशिक्षणाधिकारी यांना संस्थेकडून घेणाऱ्या कर्जाचे हप्ते नियमितपणे संस्थेला पाठवावे अशा प्रकारचे पत्र निर्गमित केले. यामुळे संस्थेच्या एनपीए कमी होण्यास मदत होणार आहे त्यामूळे संस्थेने मुख्य कार्यकारी अधिकारी अनील पाटील यांचे आभार मानले.
या प्रसंगी संस्थाध्यक्ष किशोर डोंगरवार, उपाध्यक्ष अशोक बिसेन, संदिप तिडके, गौतम बांते, शोभेलाल ठाकूर, विनोद बडोले, राजेंद्र बोपचे , उमेश रहांगडाले , सतीश दमाहे, दिलिप लोधी, राजेश रामटेके, सौ भारती तिडके, कुं नीतू डहाट , एस यू वासनिक मुख्य व्यवस्थापक व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
करारनामा मुळे संस्थेचे एन पी ए कमी करण्यास मदत–
किशोर डोंगरवार अध्यक्ष
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया व गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था गोंदिया यांच्या मध्ये कर्ज वसुली संदर्भात करारनामा झाल्यामुळें नियमीत कर्ज वसुलीचे हफ्ते व सेवा निवृत्तीनंतर थकीत कर्ज मिळण्यास मदत आणि संस्थेचे एन पी ए कमी होणार आहे करारनामा केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांचे संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार कऱण्यात येत आहे असे संस्थेचे अध्यक्ष किशोर डोंगरवार यांनी सांगितले आहे.