राजे ग्रुप घोटी द्वारे शिवजयंती जोमात साजरी
सडक अर्जुनी – प्रतिनिधी निलेश शहारे- जिल्ह्यात विविध ठिकाणी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वि जयंती साजरी करण्यात आली. तालुक्यातील ग्राम घोटी येथे राजे ग्रुप घोटी च्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले.
त्याप्रसंगी माजी मंत्री. राजकुमार बडोले, दिलीप बन्सोड जिल्हा अध्यक्ष काँग्रेस पार्टी, ,मधुसूदनजी दोनोडे सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी, डॉ.सुगत चंद्रिकापुरे, डॉ.भुमेश्वर पटले जि.प..सदस्य, शालींदर कापगते प.स.उप सभापती, अनिल दहिवले उपाध्यक्ष कृ.उ.बा.स.अर्जुनी, निशांत राऊत जिल्हा उपाध्यक्ष यु. कॉ. गोंदिया, राजूभाऊ पटले ,दामोधर नेवारे ,पुष्पा ताई खोटेले , प्रधान संपादक MKM NEWS 24 – डॉ. सुशील लाडे, दिनेश कोरे माजी सरपंच घोटी, काजल वैद्य, लीना ब्राम्हणकर,,महेंद्र हेमने, व इतर पाहुणे आणि ग्राम वाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी स्वप्नील ब्राम्हणकर, साहिल कोरे ,कृष्णा ब्राम्हणकर, प्रदिप ब्राम्हणकर, ललित वाढई, ईश्वर कठाने,, गिरीश ब्राम्हणकर, सुधीर कोरे, सुधाकर ब्राम्हणकर,भास्कर कोरे, भूपेश वाढइ, टिकू कोरे, नितेश कोरे, भूपेश कोरे,पुरभ हेमने उज्वल हेमने व इतर सहकरी यांनी सहकार्य केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश हर्षे प्रास्ताविक स्वप्नील ब्राम्हणकर तर आभार प्रदर्शन प्रदिप ब्राम्हणकर यांनी केले.