Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

कृषी पंपांना 12 तास वीज पुरवठा देण्याच्या मागणीला घेऊन शेतकऱ्यांनी रोखले राष्ट्रीय महामार्ग, पोलिसांनी घेतले ताब्यात..

पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना घेतले ताब्यात…
पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना घेतले ताब्यात…

सडक अर्जुनी, दि. 11 मार्च : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती केली जाते. खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पिकाची लागवड करत असतात. मात्र महावितरणच्या वतीने फक्त 08 तास वीज पुरवठा देण्यात येत असल्याने अपुऱ्या वीस पुरवठा अभावी शेतकऱ्यांचे रब्बी हंगाम संकटात आले आहे.

शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीने गोंदियाच्या कोहमारा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06 वर आज 11 मार्च रोजी दुपारी 12 वाजता दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. रस्ता रोको करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी शेतकरी मिथुन मेश्राम, शेतकरी दिनेश कोरे, तेजराम कठाने, खेमलाल गौतम, मग्नलाल कोल्हे, वसंत माहूर्ले, पतिराम राऊत सह अन्य शेतकरी उपस्थित होते. महामार्गावर आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना ताब्यात घेत पोलिस वाहनात कोंबले. उर्वरित शेतकरी पोलिस स्टेशवर धडकले, पोलिसांनी अत्यंत सिताफीने आंदोलन शांत केले.

गडचिरोली जिल्हा प्रमाणे गोंदिया जिल्हात 12 तास विद्युत पुरवठा ध्या.. 

युवा मित्र प्रतिष्ठान व शेतकरी संघटना यांच्या वतीने देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री महाराष्ट्र राज्य मार्फत उप अभियंता विद्युत वितरण कंपनी सडक अर्जुनी. यांना लेखी स्वरुपाचे निवेदन देण्यात आले. यात गडचिरोली जिल्हा प्रमाणे गोंदिया जिल्हात 12 तास विद्युत पुरवठा देण्याची मागणी केली आहे. आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून गोंदिया जिल्हाची ओळख आहे. जिल्ह्यातील कृषि पंपांना आता दिवसा 12 तास विज पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावे. ज्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात कृषी पंपाना 12 तास विद्युत पुरवठ्याचे आदेश 29 नोव्हेंबर 2023 रोजी दिले. त्याचप्रमाणे गोंदिया जिल्हा मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त असल्याने शेतकऱ्यांना रात्री शेतातील पिकांचे ओलीत करतांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे.

वन्यप्राणी व जंगली श्वापदांच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांना जिव गमावावे लागले त्याच प्रमाणे गोंदिया जिल्हात पन 12 तास विद्युत पुरवठा देण्यात यावा. गोंदिया जिल्हाला गडचिरोली जिल्हाची सिमा लागुन आहे. दोन हि जिल्हे हे आदिवासी नक्षलग्रस्त जंगल व्याप्त आहे. याचा विचार करून ज्याप्रमाणे गडचिरोली जिल्हाला 12 तास विद्युत पुरवठ्याचे आदेश दिले.

त्याच प्रमाणे गोंदिया जिल्हाला सुद्धा आदेश देण्यात यावे. गोंदिया जिल्ह्यात उन्हाळी हंगामात धान पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याचा विचार करता गोंदिया जिल्हाला सुद्धा 12 तास दिवसाने विद्युत पुरवठ्याचे आदेश देण्यात यावे हि विनंती. वांरवार पाठ पुरावा करून देखील या मांगणी कडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. 12 तास विद्युत पुरवठ्यासाठी घरगुती लाईन मध्ये भार नियम लागू करण्यात आले आहे. परंतु शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी 12 तास विद्युत पुरवठ्याचे आदेश देण्यात यावे. हि मागणी निवेदनातून केली आहे.

error: Content is protected !!