माजी.मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते ग्राम डव्वा व भुसारी टोला येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न
देश सक्षमीकरणासाठी, ग्रामविकास साधणे काळाची गरज
-माजी मंत्री राजकुमार बडोले
“आजच्या धकाधकीच्या काळात, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ,देशाला सक्षम व आधुनिकतेकडे घेऊन ,सक्षम राष्ट्र उभारणीसाठी ग्राम विकास ही ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले
यांनी डव्वा व भुसारीटोला येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केले”.
सडक अर्जुनी – डव्वा ता.सडक अर्जुनी येथे परमात्मा एक सेवक सभामंडप रु. १० लक्ष, भुसारीटोला येथे रस्त्याचे खडीकरण रु.१५ लक्ष इत्यादी कामांचे भूमिपूजन करण्यात आले. राष्ट्र उभारणीसाठी गावाचा वाटा मोठया प्रमाणात असून, त्या गावाचा विकास साध्य करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करीत असून सक्षम राष्ट्रनिर्मितीसाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे मनोगत याप्रसंगी व्यक्त केले.
केंद्र व राज्यात आपल्या हक्काचे सरकार असून विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध होत आहे. गावातील उर्वरित कामांसाठी देखील निधी उपलब्ध करण्यात येईल असे याप्रसंगी आश्वासित केले.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ.संगिताताई खोब्रागडे, उपसभापती शालिंदर कापगते, जिल्हा परिषद सदस्य डॉ.भुमेश्वर पटले,डव्वा ग्रा.प.संरपच सौ. योगेश्वरीताई चौधरी, भुसारीटोला ग्रा.प.संरपच मायाबाई राऊत, विस्तारक गौरेश बावनकर, तालुका महामंत्री शिशिर येळे, तुकाराम राणे, विवेक राऊत, विलास चौव्हाण,उमेश ब्राम्हणकर, गोरेलाल कुसराम, रामकृष्ण मेंन्ढे, श्रीपत थेर, शेषराव मौजे, देशमुख, गुड्डू डोंगरवार,सुनिल घासले, तेजराम खोब्रागडे, मोरेश्वर वाघाडे, भुमेश्वर वैद्ये यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.