स्मरण भीमराया ह्या ऑनलाइन क्वीज कॉम्पिटिशनचा पारितोषिक वितरण संपन्न
सड़क अर्जुनी: माजी सामाजिक न्याय मंत्री माननीय राजकुमार बडोले यांचे अध्यक्षतेखाली स्मरण भीमराया ह्या ऑनलाइन क्वीज कॉम्पिटिशनचा पारितोषिक वितरण कार्यक्रम् 1मे रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयात सडक अर्जुनी येथे घेण्यात आला.
विश्वरत्न बोधिसत्व भारतीय घटनेची शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2024, स्मरण भीमराया ह्या ऑनलाइन परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 2176 स्पर्धकांनी नोंदणी केली होती त्यापैकी दिनांक 21 मे ला घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रश्नमंजुषा परीक्षेत 492 परीक्षार्थी सहभागी झाले होते एकूण सहाशे मार्क असलेल्या अर्ध्या तासाच्या हा परीक्षेत 600 पैकी 600 गुण प्राप्त करणारे सात परीक्षार्थी होते पैकी तीन परीक्षार्थींनी वेळेत आपला फॉर्म सबमिट केल्याने क्वालिफाईड झाले. स्पर्धकांनी त्यांचा फॉर्म किती वेळात सबमिट केला ह्या बेसिसवर त्यांची रँक ठरवण्यात आली होती. स्पर्धेत प्रथम क्रमांक साठी संगीता चंदनखेडे राहणार वनी यांची वर्णी लागली तीस हजार रुपये रोख थायलंडून आणलेली बुद्धमूर्ती प्रशस्तीपत्र व शील्ड आणि द्वितीय क्रमांकासाठी नुशान घनश्याम हुमणे नागपूर ह्यस वीस हजार रुपये रोख, थायलंड इथून आणलेली बुद्धमूर्ती व शील्ड तसेच तृतीय क्रमांकासाठी स्वाती विकास उंदीरवाडे राहणार निलज जिल्हा गोंदिया हिला दहा हजार रुपये रोख थायलंड वरून आणलेली बुद्धमूर्ती प्रशस्तीपत्र व शील्ड पारितोषिक म्हणून देण्यात आले.
सर्वोत्तम दहा स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व थायलंड वरून आणलेल्या बुद्ध मुर्त्या प्रदान करण्यात आल्या स्पर्धेचे आयोजन राजकुमार बडोले फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात राकेश भास्कर प्रशांत शहारे यांनी केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये,माजी सभापती गिरधारी हत्तीमारे,माजी उपसभापती राजेश कठाणे, प्रल्हाद वरठे,तुलाराम येरणे,तुकाराम राणे,रंजनाताई भोई आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात स्पर्धक स्पर्धकांचे पालक व बहुसंख्याक उपस्थित होते.